Chinese Spy Boat : चीनची भारतीय समुद्रात हेरगिरी? मुंबईच्या समुद्र सीमेवर शेकडो चिनी बोटी तैनात

Indian Navy Slert : हेरगिरी करणारे चीनचे युआन वांग 5 जहाज मुंबईपासून 200 सागरी मैलावर...
Yuan Wang 5
Yuan Wang 5Sarkarnama
Published on
Updated on

भारताच्या समुद्र सीमेलगत हेरगिरी करणाऱ्य़ा चीनच्या शेकडो बोटींचा वावर सुरू झाल्याने भारतीय नौदल सावध झाले आहे. मुंबई आणि गुजरातच्या समुद्र सीमेवर चीनने ही हालचाल सुरू केल्याने चीनकडून नक्की काय सुरू आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, भारतीय नौदल सतर्क झाले असून त्यांनी आधीपासूनच या बोटींवर बारीक नजर ठेवली असल्याची माहिती मिळते.

Yuan Wang 5
Uddhav Thackeray : आता पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना आवाहन

भारताची समुद्र सीमा मुंबई, गुजरातपासून 200 सागरी मैलांवर आहे. त्या सीमेलगतच काही दिवसांपासून चीनच्या शेकडो बोटींचा वावर सुरू झाला आहे. त्यात युआन वांग 5 (Yuan Wang 5) या बोटीचाही समावेश आहे. या बोटीचे वैशिष्ट्य म्हणजे यावर ट्रॅकिंग तसेच हेरगिरी करण्यासाठी उपयुक्त अशा अत्याधुनिक यंत्रणा आहेत. विशेष म्हणजे बंगालच्या उपसागरात भारताची प्रक्षेपणास्त्राची चाचणी प्रस्तावित असताना ही घडामोड घडली आहे. या चाचणीसाठी भारताने आंतरराष्ट्रीय नियमानुसार नोटीस ऑफ एअरमेन (NOTAM)दिली होती.

आता मुंबई आणि गुजरात समुद्र सीमेपासून 200 सागरी मैलांवर चीनी बोटी आढळल्याने त्यांच्याकडून भारतीय बंदरांची माहिती तसेच पाणबुड्यांची जागा शोधण्याचे काम सुरू असल्याचा भारतीय गुप्तचर यंत्रणांचा अंदाज आहे. चिनी नौदलाच्या या अप्रत्यक्ष घुसखोरीला भारतीय नौदलाच्या वरिष्ठ कमांडर आणि नौदलाच्या संरक्षण सल्लागार दलानेही दुजोरा दिल्याची माहिती मिळत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यातील बहुतांश बोटी या अमेरिकेच्या परदेश मालमत्ता नियंत्रण कार्यालयाच्या निर्बंधांच्या यादीत आहेत. भारतीय नौदलाचे वर्चस्व असलेल्या समुद्रात अचानक चिनी बोटी आल्या आहेत. त्यामुळे भारतीय नौदल आणि गुप्तचर यंत्रणेची चिंता वाढली आहे. यापूर्वी चीनने अरुणचल प्रदेशमधून भारतीय भूभागावर कब्जा करण्याचे अनेक प्रयत्न केले आणि भारतीय सैन्याने ते वेळोवेळी हाणून पाडले. आता समुद्रातून भारतावर हेरगिरी करण्याचे चीनचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जाते.

(Edited by Avinash Chandane)

Yuan Wang 5
Maharashtra News : धक्कादायक! महाराष्ट्रात घडल्या सर्वाधिक दंगली; आठ हजारांहून अधिक घटनांची नोंद

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com