

Teacher Caught Writing Answers in SSC Exam: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचा पेपर थेट शिक्षकानेच लिहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इतकेच नव्हे तर या शिक्षकाला मुख्याध्यापकाची देखील साथ असल्याचे समोर आले.
उत्तरपत्रिका तपासणीमध्ये हा प्रकार संबंधित शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कोकण विभागीय शिक्षण मंडळाकडे याबाबतची तक्रार केली होती. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. तर शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. संपूर्ण प्रकारामुळे कोकण शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
संबंधित प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील ओरस येथे घडला आहे. या घटनेची दखल कोकण विभागीय शिक्षण मंडळाने घेतली असून प्राथमिक चौकशीत बिंग फुटले असून शिक्षक आणि मुख्याध्यापकावर कारवाईटी टांगती तलवार आहे.
वैभववाडीतील एका परीक्षा केंद्रावरील उत्तरपत्रिका तपासणी करत असताना शिक्षकाला विद्यार्थ्याची मूळ उत्तरपत्रिका व पुरवणीतील हस्ताक्षर यात स्पष्ट फरक आढळून आला. या उत्तरपत्रिकेत अफरातफर झाल्याची बाब लक्षात येताच संबंधित तपासणी शिक्षकाने याची तक्रार कोकण बोर्डाकडे केली.
संबंधित घटनेची प्राथमिक चौकशी केली असता त्यामध्ये तथ्य आढळले. या घटनेची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाला सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले. या चौकशीत संबंधित विद्यार्थ्यांच्या पुरवणी उत्तरपत्रिका एका शिक्षकाने लिहिल्याचे उघड झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पुढील तपास उपशिक्षणाधिकारी संजय माने यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
संबंधित दोन्हीही उत्तरपत्रिका ह्या तपासणीसाठी तज्ञांकडे पाठवण्यात येणार आहेत. संबंधित उत्तरपत्रिका एका शिक्षकाने लिहिल्याचे निश्चित झाले असून, इतर बाबींची चौकशी सुरू आहे. संबंधित विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला असून, दोषी शिक्षकासह संबंधित सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल, असे कोकण बोर्डाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.