
थोडक्यात बातमी:
शेतकरी क्रांती संघटनेचा शिवसेनेत प्रवेश: गजानन बिलेवर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी क्रांती संघटनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलीन होणे ही मोठी राजकीय घटना ठरली आहे.
विदर्भात पक्षबांधणीसाठी जोरदार प्रयत्न: संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींनी पक्षप्रवेश केला असून विदर्भात शिवसेनेची ताकद पुन्हा वाढताना दिसत आहे.
उद्धव ठाकरेंचा विश्वास आणि भाष्य: अनेकांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला तरी निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे पक्ष टिकून आहे, असे ठाकरेंनी स्पष्ट केले.
Mumbai News : विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एकापाठोपाठ एक धक्के बसत असून पक्षाला लागलेली गळती थांबताना दिसून येत नाही. अशातच आता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. याचदरम्यान,आता उद्धव ठाकरेंसाठी (Uddhav Thackeray) मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
विदर्भातील नेते, कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (ता.2 ऑगस्ट) मातोश्रीवर विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांच्यासह पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी दिसून आली. याचवेळी विदर्भात मोठी ताकद असलेल्या शेतकरी क्रांती संघटना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत विलीन करण्यात आली.
काँग्रेस आणि भाजपनंतर आता उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही (Shivsena) महाराष्ट्रातील विदर्भ,कोकण,पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात आता चांगलीच अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकरी क्रांती संघटना आणि विविध नेतेमंडळींनी मातोश्रीवर मशाल हाती घेतली.
विदर्भात शेतकरी क्रांती संघटनेची मोठी ताकद असल्याचे बोलले जाते. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन बिलेवर यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश झाला. यामुळे पश्चिम विदर्भात उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं बळ वाढणार आहे.
शेतकरी क्रांती संघटनेमुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आगामी स्थानिक निवडणुकीत मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.तर संजय देरकर वणी विधानसभा यांचा नेतृत्व खाली 3 जिला परिषद सदस्य यांची 45 सरपंच पक्ष प्रवेश केला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर आहेत. त्यांनी शिवसेनेचे (UBT) प्रतिनिधित्व करत 2024 ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जिंकली होती. याच देरकर यांच्या नेतृत्वाखाली वणी विधानसभा मतदारसंघामधील 3 जिल्हा परिषद सदस्य आणि 45 सरपंचांनी ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे.
एकीकडे विदर्भात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे धक्के बसत असताना आता जुन्या फळीतील नेत्यांनी आता पुन्हा एकदा पक्षबांधणीसाठी पुढाकार घेतला आहे. यात बुलडाण्याचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांनी जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी कंबर कसली आहे.
उद्धव ठाकरे यांनी शेतकरी क्रांती संघटनेच्या पक्षप्रवेशानंतर मातोश्रीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, अनेकजण शिवसेना संपवायला निघाले आहेत. उद्धव ठाकरे यांना संपवायला निघाले आहेत. त्यांना आता खरा प्रश्न पडला आहे की, उद्धव ठाकरे हे संपत का नाहीत? कारण सगळीच माणसं काही पैशांनी विकली जात नाही अशी टीकाही त्यांनी बोलून दाखवली.
तसेच उद्धव ठाकरे म्हणाले, काही गद्दार पैशांनी विकले जाऊ शकतात. पण निष्ठावंत विकले जाऊ शकत नाहीत. माझ्यासोबत आता माझे सगळेच जुने सहकारी आहेत. आपण ज्या लोकांना मोठे केले, ते आपल्याला सोडून गेले. पण ज्यांना त्या लोकांना मोठे केले, ती माणसं माझ्यासोबत असल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं.
प्र.1: शेतकरी क्रांती संघटनेचे कोण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सामील झाले?
उ: गजानन बिलेवर आणि संघटनेचे अनेक पदाधिकारी शिवसेनेत सामील झाले.
प्र.2: विदर्भात शिवसेनेच्या प्रवेशामुळे कोणता राजकीय बदल अपेक्षित आहे?
उ: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेचा प्रभाव आणि मतांची ताकद वाढण्याची शक्यता आहे.
प्र.3: उद्धव ठाकरे यांनी पक्षातील गद्दारांविषयी काय म्हटले?
उ: काहीजण पैशांनी विकले जाऊ शकतात पण निष्ठावंत कार्यकर्ते कधीही विकले जात नाहीत, असे त्यांनी सांगितले.
प्र.4: संजय देरकर यांच्या नेतृत्वात कोणत्या नेत्यांनी पक्षप्रवेश केला?
उ: वणी मतदारसंघातील 3 जिल्हा परिषद सदस्य आणि 45 सरपंच शिवसेनेत दाखल झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.