Sunil Tatkare News: कोकणातील खासदाराला पुन्हा दिल्लीचे वेध...

Maharashtra Politics: उमेदवारीवरून भाजप राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच होणार
Sunil Tatkare News
Sunil Tatkare NewsSarkarnama
Published on
Updated on

Raigad Political News : रत्नागिरी लोकसभा मतदार संघात सुनील तटकरे हे विद्यमान खासदार आहेत मात्र यावेळी ही जागा महायुतीकडुन राष्ट्रवादीकडे राहणार की भाजपाला जाणार या चर्चा सुरू झाल्या आहेत.

राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार सुनील तटकरे तर भाजपाकडून धैर्यशील पाटील अशी दोन नावं या मतदारसंघात रत्नागिरी रायगड लोकसभा मतदारसंघासाठी चर्चेत आहेत. अशातच आता भाजपा व राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा सुरू असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

खासदार सुनील तटकरे यांनी आता आपले मन दिल्लीत रमू लागलेय असं सांगत पुन्हा एकदा या मतदारसंघातून उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघातही उमेदवारीवरून भाजप राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच होणार असल्याचे दिसत आहे.

सुनील तटकरे म्हणाले, "खरं सांगायचं तर 2014 माझी इच्छा महाराष्ट्रात राहण्याची इच्छा होती मी त्यावेळेला सलग पंधरा वर्षे मंत्री होतो पण पक्षश्रेष्ठीनी सांगितलं मी उमेदवारी केली पुन्हा एकदा 2019 ला उमेदवारी मिळाली निवडून आलो.

आता मला प्रदेशाध्यक्ष अजित दादांनी केलं आहे. त्यामुळे मी अर्धा महाराष्ट्रामध्ये आहे. पण आता मी दिल्लीत हळूहळू रमायला लागलो आहे, असे रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांजवळ बोलताना स्पष्ट केलं.

आता आपल्याला दिल्लीत जायला जास्त बरं वाटेल कारण दिल्लीत आता पुन्हा एनडीएच सरकार येणार आहे. सरकार पक्षामध्ये जाणं याचा अधिक फायदा आपल्या लोकसभा मतदारसंघाला होतो, असा आपला गेल्या चाळीस वर्षातला प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे या वेळेला जर का महायुतीने ठरवलं तर मला पुन्हा एकदा दिल्ली जायला जास्त आवडेल, असे सूचक विधान खासदार सुनील तटकरे यांनी केलं आहे.

Sunil Tatkare News
Sandipan Bhumre : निकाल आमच्या बाजूनेच, ठाकरे गटातील आमदारही आमच्याकडेच येतील...

आता या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपा व राष्ट्रवादी या महायुतीकडून रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी कोणाला दिली जाते? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com