Anant Geete : मतमोजणी केंद्रात अनंत गिते ठाण मांडून..! तटकरेंचे लीड 57 हजारावर

Raigad constituency 2024 Anant Geete Sunil Tatkare : सुरवातीच्या काही फेऱ्यांमध्ये आनंद गिते आघाडीवर दिसत होते. मात्र, ही आघाडी मोडून काढून सुनील तटकरे यांनी सात फेऱ्यांमध्ये 22 हजारांचे लीड घेतले आहे.
Sunil Tatkare Anant Geete
Sunil Tatkare Anant Geetesarkarnama

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत रायगडमध्ये काटे की टक्कर होईल, असा अंदाज होता. एक्झिट पोलमध्ये तर सुनील तटकरे पराभूत होत असल्याचे अंदाज होते. मात्र, प्रत्यक्ष मत मोजणीच्या दिवशी सुनील तटकरे यांनी आघाडी घेतली. मतमोजणी केंद्रावर सकाळीच अनंत गिते आणि सुनील तटकरे उपस्थित होते. मात्र, आघाडी वाढल्यानंतर तटकरे गेले. त्यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत बैठक सुरू होती. मात्र, अंनत गिते मतमोजणी केंद्रात ठाणमांडून होते.

15 वी फेरी अखेर तटकरेंचे लीड 44 हजार 429 वर पोहचले होते. त्यामुळे अजित पवार गट एक जागा जिंकणार ही आशा पल्लवीत झाली होती. तर, ठाकरे गट आपली हक्काची जागा गमवणार असल्याची स्थिती निर्माण झाली. मात्र, तटकरेंचे लीड वाढत असतानाही गितेंनी आशा सोडली नाही. ते मतमोजणी केंद्रात ठाण मांडून होते. 17 वी फेरी अखेर तटकरेंचे लीड 57 हजारांवर पोहचले होते.

सुरवातीच्या काही फेऱ्यांमध्ये आनंद गिते आघाडीवर दिसत होते. मात्र, ही आघाडी मोडून काढून सुनील तटकरे यांनी सात फेऱ्यांमध्ये 22 हजारांचे लीड घेतले आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे अनंत गिते डेंजर झोनमध्ये आले आहेत. हे लीड वाढत जावून गिते तब्बल 44 हजार 429 मतांनी पिछाडीवर पडले. तर,17 व्या फेरी अखेर सुनील तटकरे यांना 46 हजार 905 मतांचे लीड घेतले होते

Sunil Tatkare Anant Geete
Chandrashekhar Bawankule : जैसी करणी वैसी भरणी! बावनकुळेंच्या प्रदेशाध्यक्षपदावर पडणार कुऱ्हाड?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com