Chandrashekhar Bawankule : जैसी करणी वैसी भरणी! बावनकुळेंच्या प्रदेशाध्यक्षपदावर पडणार कुऱ्हाड?

Lok Sabha Election Result 2024 Live Vidarbha BJP Lok Sabha Candidate: विदर्भातील 10 जागांपैकी नागपूरसह फक्त दोन जागांवर महायुतीचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. तर बाकीचे पिछाडीवर आहेत. त्यामुळे भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात येण्याची शक्यता आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Vidarbha Lok Sabha Election Result 2024 Live: गृह जिल्ह्यातच महायुतीचा उमेदवार पराभूत झाल्याने भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. विदर्भातील 10 जागांपैकी नागपूरसह फक्त दोन जागांवर महायुतीचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे रामटेक लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघात राहतात. त्यांच्या आग्रहावरून रामटेकचा उमेदवार बदलण्यात आला. खासदार कृपाल तुमाने यांनी शिवसेनेला रामटेकचा गड सलग दोन वेळा जिंकून दिला होता. असे असतानाही बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उमेदवार बदलण्यास भाग पाडले.

कृपाल तुमाने यांच्याऐवजी शिंदे सेनेने राजू पारवे यांना काँग्रेसमधून आयात केले. पारवे हे रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमरेडचे आमदार आहेत. त्यांना भाजपमधून लढायचे होते. उमेदवारीचा शब्द बावनकुळे यांनी आधीच दिला होता. मात्र शिंदे सेनेने जागा सोडण्यास नकार दिला. त्यामुळे उमेदवार भाजप आणि तिकीट शिवसेनेचे असा समझोता रामटेकमध्ये करण्यात आला.

उमेदवार ठरवताना भाजपच्या दिल्लीत बड्या नेत्यांनी स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतले होते. रामटेकची हमी बावकुळे यांनी दिली होती. मात्र येथे महायुतीचे राजू पारवे पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. पाचव्या फेरीअखेर काँग्रेसचे श्याम बर्वे यांनी 28 हजार मतांची आघाडी घेतली आहे. बावनकुळे पालकमंत्री राहिलेल्या भंडारा जिल्ह्यात भाजप व काँग्रेसमध्ये अतिशय अटीतटीची लढत सुरू आहे.

Chandrashekhar Bawankule
Chandrapur Constituency: मैं शेरनी हूं एक जिगर वाले की! प्रतिभाताई बाळू धानोरकरांचा गड राखणार...

गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये भाजपचे उमेदवार जवळपास पराभूत झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष या नात्याने पराभवाचे खापर बावकुळे यांच्यावर फोडले जाऊ शकते. विशेष म्हणजे बावनकुळे यांच्या नेतृत्वात यापूर्वी झालेल्या नागपूर विभागीय शिक्षक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघातही भाजपचे उमेदवार पराभूत झाले आहेत. त्यामुळे आता त्यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात येणार की काय अशा चर्चांना उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com