Sharad Pawar : अजित पवारांबाबत गैरसमज पसरविले जातात; पवारांकडून पाठराखण

Ajit Pawar : पवारांच्या पत्रकार परिषदेला गैरहजेरीमुळे अजित पवारांबाबत पुन्हा चर्चा
Ajit Pawar, Sharad Pawar
Ajit Pawar, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar Support Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज आहेत. ते भाजपसोबत जाणार आहेत, या आशयाच्या चर्चा होत आहेत. त्यानंतर स्वतः अजित पवार यांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन केले होते. दरम्यान, शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. ५) मुंबईत पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यावेळी अजित पवार उपस्थित नव्हते. त्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आले.

Ajit Pawar, Sharad Pawar
Sharad Pawar : मी खूप भाग्यवान; शरद पवार असं का म्हणाले ?

या चर्चांचे पवार यांनी पत्रकार परिषदेतच खंडण केले. पवारांना अजित पवार (Ajit Pawar) गैरहजर असल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पवार म्हणाले, "पत्रकार परिषदेसाठी मी कुणालाही निमंत्रण दिलेले नाही. येथे सर्वांनीच उपस्थित असण्याचे काही कारणही नाही. ते पक्षात झालेल्या सर्व घडामोडींत सहभागी होते." यानंतर शनिवारी (ता. ६) एका वृत्तवाहिनीशी बोलताना पवार यांनी अजित पवारांची पाठराखण केली आहे.

Ajit Pawar, Sharad Pawar
Sharad Pawar : सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात गेला तरी शिंदे-फडणवीस सरकारवर परिणाम होणार नाही : पवारांचे महत्वपूर्ण विधान

अजित पवार नॉटरिचेबल असले की त्यांच्याबाबत चर्चा होतात. ते भाजपमध्ये (BJP) जाण्याची चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळात होत आहे. याबाबत पवार (Sharad Pawar) म्हणाले, "अजित पवारांबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जातेय. काही लोकांच्या कामाच्या पद्धती वेगळी असतात. अजित पवार मीडीया फ्रेंडली नाहीत. ते ग्राऊंडवरील कामाला महत्व देतात. काही लोक उगाच अशा चर्चा करीत असतात. त्या चर्चांना काही अर्थ नसतो."

Ajit Pawar, Sharad Pawar
Jayant Patil : शिवसेनेसारखा मजबूत पक्ष भाजपने फोडला; आता त्यांची नजर इतर पक्षांवर : पण, राष्ट्रवादी...जयंत पाटील थेटच बोलले

दरम्यान, शरद पवारांनी मी खूप भाग्यवान असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, "बारामती (Baramati), राज्य तसेच देशाच्या जनतेचे गेली ५६ वर्षे मला प्रेम दिले. त्यामुळे मी खूप भाग्यवान आहे. दरम्यान, मला काही महिन्यांपासून वाटू लागेल की खासदारकीची अजूनही माझी तीन वर्षे आहेत. त्यामुळे आतापासून देश आणि राज्यपातळीवर नेतृत्व तयार करण्याची आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम मी थोडे बाजूला झालो पाहिजे, नव्यांना संधी दिली पाहिजे. मी बाजूला होणे म्हणजे घरी बसणे नव्हे तर लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये राहून काम करणे हा माझा निश्चय होता. त्यानंतरच मी निर्णय घेतला होता."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com