Sharad Pawar : मी खूप भाग्यवान; शरद पवार असं का म्हणाले ?

Opposition Leaders : सर्व सहकाऱ्यांच्या मतांचा आदर करावा लागतो
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar News : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. ५) आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला. त्यावेळी त्यांनी जोमाने काम करणार असल्याचेही जाहीर केले. तसेच पक्षांतर्गत नेतृत्व तयार करणार असल्याचेही पवार म्हणाले होते. दरम्यान, पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निश्चय का केला होता, याबाबत सांगितले. तसेच मी खूप भाग्यवान आहे, असे विधानही शरद पवार यांनी केले. ते शनिवारी (ता. ६) एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

Sharad Pawar
Karnataka Elections 2023: राहुल गांधींच्या अडचणी वाढणार: गुजरातनंतर आता कर्नाटकात दाखल होणार मानहानीचा खटला...

अध्यक्षपदावरून मुक्त होण्यासाठी तयारी केली होती, असे पवार यांनी सांगितले. शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, मी स्वतः विचारपूर्वक अध्यक्षपदाच्या जबाबदारीपासून मुक्त व्हावे यासाठी तयार झालो होतो. गेल्या सहा दशकांपासून सार्वजनीक जीवनात काम करत आहे. राजकारणात आल्यापासून मी विधमंडळ, लोकसभा असे कुठे ना कुठे काम करत आहे. या देशात आज ५६ वर्षे निवडून आलेले लोक मला माहिती आहेत.

Sharad Pawar
Jayant Patil : शिवसेनेसारखा मजबूत पक्ष भाजपने फोडला; आता त्यांची नजर इतर पक्षांवर : पण, राष्ट्रवादी...जयंत पाटील थेटच बोलले

यावेळी पवार यांनी मी खूप भाग्यवान असल्याचे सांगितले. ते म्हणाले, "बारामती (Baramati), राज्य तसेच देशाच्या जनतेचे गेली ५६ वर्षे मला प्रेम दिले. त्यामुळे मी खूप भाग्यवान आहे. दरम्यान, मला काही महिन्यांपासून वाटू लागेल की खासदारकीची अजूनही माझी तीन वर्षे आहेत. त्यामुळे आतापासून देश आणि राज्यपातळीवर नेतृत्व तयार करण्याची आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम मी थोडे बाजूला झालो पाहिजे, नव्यांना संधी दिली पाहिजे. मी बाजूला होणे म्हणजे घरी बसणे नव्हे तर लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये राहून काम करणे हा माझा निश्चय होता. त्यानंतरच मी निर्णय घेतला होता."

Sharad Pawar
Basavaraj Bommai News : कर्नाटकचे मुख्यमंत्री पुन्हा बरळले : ‘महाराष्ट्र एकीकरण समिती ही उचापती लोकांची संघटना; आम्ही त्यांचा बंदोबस्त करू’

सामाजीक जीवनात काम करताना सहकाऱ्यांच्या मतांकडे दुर्लक्ष करता येत नाही. त्यातून निर्णय मागे घेतल्याचे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. शरद पवार म्हणाले, "अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर कार्यकर्त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया येतील याची कल्पना आली नाही. तसेच त्यांची समजूत काढता येईल असा माझा अंदाज होता. मात्र तो चुकला. त्यांच्या भूमिकेमुळे समजूत काढण्याची स्थिती उरली नाही. राज्यासह देशातील इतर अत्यंत महत्वाच्या लोकांच्या प्रतिक्रिया निर्णयाविरोधात आल्या. त्यांनी मला निर्णय मागे घेण्याची विनंतीही केली. "

पवार म्हणाले, "एका वर्षात लोकसभा निवडणूक (Loksabha) आहे. त्यासाठी आतापासूनच वातावरण निर्मिती होऊ लागली आहे. या स्थितीत मी बाजूला राहणे योग्य नसल्याचे अनेकांनी सांगितले. मी पक्षाच्या अध्यक्षपदी राहण्यासाठी त्यांनी आग्रह केला. शेवटी समाजिक जीवनात सहाकाऱ्यांच्या मतांचा आदर केला पाहिजे. आपली काही मते असतात, मात्र सहकाऱ्यांच्या मतांचाही विचार करावा लागतो. त्यानुसार निर्णयात बदल करावा लागतो. त्यामुळे मी पुन्हा अध्यक्षपदावर आलो."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com