भाजपला मोठा धक्का : शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणारे दहा नगरसेवक अपात्र!

याबाबत जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्यासमोर सुनावणी सुरू होती.
BJP-shivsena
BJP-shivsenasarkarnama
Published on
Updated on

माथेरान : शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या माथेरान नगरपरिषदेच्या दहा नगरसेवकांना रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज (ता. २९ ऑक्टोबर) दणका दिला. भाजपवासी झालेल्या या दहाही नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी दिला आहे. (Ten Shiv Sena corporators from Matheran who joined BJP were disqualified: Raigad District Collector's decision)

माथेरान नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथस आरोग्य सभापती आकाश कन्हैया चौधरी, नगरसेवक राकेश नरेंद्र चौधरी, संदीप कदम, स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत जाधव, सोनम दाभेकर, महिला बालकल्याण समितीचे सभापती, प्रतिभा घावरे, शिक्षण समितीचे सभापती, रुपाली आरवाडे, सुषमा जाधव, प्रियांका कदम, ज्योती सोनावळे या दहा नगरसेवकांवर जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी आपत्रातेची कारवाई केली आहे.

BJP-shivsena
चंद्रकांतदादा हल्ली झोपेतही बोलतात, त्यांचे बोलणे फार मनावर घेऊ नका : जयंत पाटील

माथेरान नगरपरिषदेच्या शिवसेनेच्या दहा नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे भाजपमध्ये प्रवेश केला होता. या पक्षांतराच्या निर्णयाविरोधात माथेरान नगरपरिषदेतील शिवसेनेचे गटनेते प्रसाद सावंत यांनी रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्याकडे पक्षांतर बंदी कायद्यानुसार तक्रार दाखल केली होती.

BJP-shivsena
शरद पवारांविषयी अपशब्द बोलणारे तुषार भोसले महिलांच्या धास्तीने पोलिस ठाण्यात दडले!

याबाबत जिल्हाधिकारी कल्याणकर यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. अखेरची सुनावणी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्यासमोर ता. 27 ऑक्टोबर रोजी झाली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी सुनावणीचा निकाल राखून ठेवला होता. अखेर आज नऊ नगरसेवकांसह एक स्वीकृत असे दहाही भाजपवासी झालेल्या नगरसेवकांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरविले आहे. तसा आदेश सर्व नगरसेवक यांना पोस्टाने कळविण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षात गेलेल्या या नगरसेवकांना अपात्र ठरविल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com