

राज्यातील महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतरही तळकोकणात भाजप नेते नितेश राणे आणि शिवसेनेचे दीपक केसरकर यांच्यात वाद उफाळला आहे.
नितेश राणेंनी स्वबळावर लढण्याचे वक्तव्य केल्याने केसरकर यांनी त्यांना पुन्हा विचार करण्याचा सल्ला दिला.
केसरकरांनी “ते तयार नसतील तर आम्हीही स्वतंत्र लढू” असा इशारा दिल्याने सिंधुदुर्गात युती तुटल्याचे संकेत मिळत आहेत.
Sindhudurg News : राज्यातील आगामी नगरपालिका निवडणुकांची घोषणा झाली असून आता निवडणुकीच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. त्याप्रमाणे महायुती आणि महाविकास आघाडीच्या स्थानिक पातळीवर हालचाली वाढल्या असून कुरघोड्या सुरू झाल्या आहेत. अशातच तळकोकणात महायुतीत फिस्कटल्याचे समोर येत असून युती तुटल्याचे दिसत आहे. यावरून भाजप नेते पालकमंत्री नितेश राणे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यात कलगितूरा रंगला आहे. केसरकर यांनी युतीवरून थेट महायुतीलाच घरचा आहेर दिला आहे. तसेच स्वबळाची भाषा करणाऱ्या राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवले पाहिजे. अन्यथा शिवसेना एकटी लढेल. महायुती म्हणून लढलो असतो तर कणकवलीसारखी परिस्थिती निर्माण झाली नसती,” असे खडे बोल सुनावत केसरकरांनी राणेंना फेरविचार करण्याचा सल्ला दिला.
आगामी नगरपालिका निवडणुकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापलेच असून नितेश राणे यांनी केलेल्या स्वबळाच्या भाषेमुळे येथे वाद उफाळला आहे. तर नितेश राणेंच्या या वक्तव्यामुळे येथे वादाची ठिणगी पडली असून माजी मंत्री दीपक केसरकर यांनीही आपली देखील स्वबळाची तयारी असल्याचे म्हणत युती तुटल्याची घोषणा केली आहे. तसेच नितेश राणेंनी फेरविचार करावा असाही सल्ला त्यांनी दिली आहे.
केसरकरांनी नितेश राणेंच्या वक्तव्यावरून महायुतीला घराचा आहेर दिला असून नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे. महायुती म्हणून निवडणूक लढवली असती तर कणकवलीमधील आजची परिस्थिती निर्माण झाली नसती.
आपण महायुती म्हणून लढवलं पाहिजे असा आपला सुरवातीपासून आग्रह होता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचीही युतीला संमती होती. मात्र, कुठे माशी शिंकली माहिती नाही. उलट नितेश राणे यांनी पालकमत्री म्हणून स्वतः युतीसाठी पुढाकार घ्यायला हवा होता, असेही त्यांनी म्हणत नितेश राणेंना फटकारले आहे.
तसेच पालकमत्री म्हणून नितेश राणेंच्या मागे शिवसेना आणि आमदार म्हणून गेले वर्षभर ठामपणे उभे आहे. त्यामुळे त्यांनी अजूनही युतीबाबत विचार करावा. आम्ही नेहमी लवचिक आहोत, महाराष्ट्रात जशी महायुती भक्कम आहे, तशी ती कोकणात राहावी, हीच आमची मागणी आहे, हेच बाळासाहेबांचं स्वप्न होत. यामुळे अजूनही वेळ गेली नसून नितेश राणेंनी युतीचा विचार करावा, असाही सल्ला केसरकर यांनी दिला आहे. यामुळे ता नितेश राणे नेमकी कोणती आणि काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री नितेश राणेंनी भाजपची ताकद असल्यामुळे स्वबळावर निवडणुका झाल्या पाहिजेत असा आग्रह धरला. तसेच भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या तशाच भावना असून आपण आपला झेंडा फडकला पाहिजे, असे म्हटले होते. तसेच संपूर्ण कोकणात अशी एकतरी विधानसभेची जागा दाखवा जी भाजपच्या ताकदीशिवाय आमदार झाला आहे. येथे भाजप शिवाय कोणीही आमदार होऊ शकत नाही, असं वक्तव्य राणेंनी केलं होतं.
1. सिंधुदुर्गमध्ये कोणत्या नेत्यांमध्ये वाद उफाळला आहे?
भाजप नेते नितेश राणे आणि शिंदे गटाचे दीपक केसरकर यांच्यात वाद उफाळला आहे.
2. वादाचे कारण काय आहे?
नितेश राणे यांनी “स्वबळावर लढू” असे वक्तव्य केल्यामुळे केसरकर नाराज झाले.
3. महायुतीवर याचा परिणाम होईल का?
होय, तळकोकणातील महायुती तुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
4. दीपक केसरकर यांनी काय प्रतिक्रिया दिली?
त्यांनी सांगितले की, “पालकमंत्र्यांनी विचार करावा, अन्यथा आम्हीही स्वतंत्र लढू.”
5. हा वाद आगामी निवडणुकीत कसा परिणाम करू शकतो?
या वादामुळे महायुतीच्या जागावाटप आणि प्रचार रणनीतीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.