Mayor Election : कोकणात नगराध्यक्षपदावरून घमासान? दादांच्या आमदाराने फक्त दावेदारी सांगितली, शरद पवारांनी नावही फिक्स केलं

Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP SP MLA Over Mayor Post : तळकोकणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. अशातच चिपळूणमध्ये नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस रिंगणात उतरली आहे.
Ajit Pawar Vs Sharad Pawar
Ajit Pawar Vs Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. चिपळूण नगराध्यक्षपदावरून महायुतीतील वाद उफाळून आला असून आमदार शेखर निकम यांच्या दावेदारीवरून मंत्री उदय सामंत नाराज झाले आहेत.

  2. महायुतीत सुरू असलेल्या या कलहाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने सक्रिय भूमिका घेत रणनीती आखली आहे.

  3. राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदासाठी स्वतंत्र पार्लमेंटरी बोर्ड तयार करून निवडणूकपूर्व हालचालींना वेग दिला आहे.

Chiplun Politics News : चिपळूण नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून महायुतीत आधीच वादाची ठिणगी पडली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी स्वबळाची तयारी दर्शवत थेट महायुतीलाच इशारा दिला होता. यावरून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केलीय. त्यांनी थेट निकम यांना खडे बोल सुनावले होते. यावरून सध्या जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे. अशातच येथे नगराध्यक्षपदावरून राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी असा सामना होण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील आपला उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्धार केला आहे. या निर्णयामुळे आता येथील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाचे पार्लमेंटरी बोर्डदेखील तयार केले आहे.

आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी राहणार की, सर्व पक्ष नशीब आजमावणार याचा निर्णय अद्यापही झालेला नाही. तर अशीच काहीशी स्थिती महायुतीत देखील आहे. पण जागा वाटपांसह निवडणुकीच्या योग्य निर्णयासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून पार्लमेंटरी बोर्ड जिल्हा पातळीवर करण्याची घोषणा काहीच दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली होती. त्याच धर्तीवर एक पाऊल पुढे टाकत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने पार्लमेंटरी बोर्डदेखील तयार करण्याची घोषणा केली आहे. फक्त घोषणाच केली नाही तर एक पाऊल पुढे टाकत स्वबळाचा नारा देखील दिला आहे. ‌याची माहिती माजी आमदार रमेश कदम यांनी दिली आहे.

यावेळी कदम यांनी, चिपळूण शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि नागरिकांच्या स्थानिक प्रश्नांचे समाधान करण्यासाठी हा निर्णय पक्षाने घेतला आहे. तर यासाठी जनतेनं आग्रह धरल्याचेही त्यांनी जाहीर केले. शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याबाबत कदम यांच्यापुढे पक्षाने निवडणूक लढवण्याबाबत आग्रह धरला होता. बैठकीत नगराध्यक्षपदासाठी सर्वानुमते नावही निश्चित केल्याची माहितीही आता समोर येत आहे.

Ajit Pawar Vs Sharad Pawar
Sangamner Municipal Mayor Election : नगराध्यक्ष महिला होणार, पण डावपेच विखे, थोरात, तांबे अन् खताळांमध्ये रंगणार!

आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी आणि अचूक नियोजनासाठी पक्षाचा पार्लमेंटरी बोर्डदेखील जाहीर झाले आहे. या बोर्डात ज्येष्ठ तसेच तरुण कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. त्यात रमेश कदम, सुचय आण्णा रेडीज, शिरीष काटकर, सतीश खेडेकर, रतन पवार, सावित्रीताई होमकळस, छाया खातू, अजमल पटेल, भाई गुढेकर, सुरेश चिपळूणकर, हिंदुराव पवार, डॉ. रहिमत जबले, संजय तांबडे, मोहम्मद पाते, श्रीनाथ खेडेकर आणि अफजल कच्छी यांचा समावेश आहे. हा बोर्ड निवडणुकीची संपूर्ण रणनीती ठरवून समन्वयाने अंमलबजावणी करणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.

आघाडीबाबत सकारात्मक

चिपळूण येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस या पक्षांसोबत आघाडीबाबत सकारात्मक भूमिका जाहीर केली. स्थानिक पातळीवर योग्य राजकीय समीकरणे साधून विरोधी पक्षांना शह देण्यासाठी आणि पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी पक्ष सज्ज असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

Ajit Pawar Vs Sharad Pawar
Dapoli Mayor Election : अखेर ठाकरेंना धक्का! दापोलीत सत्तापालट, तीन वर्षांनंतर योगेश कदमांनी वचपा काढत फडकवला नगरपंचायतीवर भगवा

FAQs :

1. चिपळूणमध्ये वाद कशावरून सुरू झाला आहे?
आमदार शेखर निकम यांच्या नगराध्यक्षपदासाठीच्या दावेदारीवरून महायुतीत वाद सुरू झाला आहे.

2. मंत्री उदय सामंत यांनी काय भूमिका घेतली आहे?
उदय सामंत यांनी या दावेदारीवर नाराजी व्यक्त केली असून महायुतीत समन्वयाचा अभाव असल्याचे सूचित केले.

3. राष्ट्रवादीकडून कोणती हालचाल करण्यात आली आहे?
राष्ट्रवादीने चिपळूण नगराध्यक्षपदासाठी रणनीती आखत पार्लमेंटरी बोर्ड तयार केला आहे.

4. शरद पवार गटाने काय पाऊल उचलले आहे?
शरद पवार गट सक्रिय झाला असून चिपळूण निवडणुकीत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याची तयारी केली आहे.

5. या वादाचा महायुतीवर काय परिणाम होऊ शकतो?
महायुतीत अंतर्गत मतभेद वाढू शकतात आणि राष्ट्रवादीला याचा राजकीय फायदा मिळू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com