Konkan Political News : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केल्यानंतर मोठा सकारात्मक बदल झाला. आपला जिल्हा सर्वच बाबतीत बेस्ट आहे. व्होकल फॉर लोकलचा प्रचार आपणच करायचा आहे, जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून विकास शक्य आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले. तसेच नवसाला पावणारी भक्तवत्सल श्री देवी भराडी आईचे दर्शन घेतले. लोकसभेच्या महाविजयासाठी आपण आज आई भराडी देवीच्या चरणी नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हावेत, असे साकडे घातल्याचेही चव्हाणांनी आंगणेवाडी येथे सांगतिले.
मार्च महिन्यात आंगणेवाडी येथील होणार्या जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील विकास कामांचा त्यांनी आढावा घेतला. तसेच स्वच्छतागृहांचे लोकार्पणही केले. या सोहळ्याला माजी खासदार नीलेश राणे (Nilesh Rane), आमदार राजन तेली, जिल्हाधिकारी किशोर तावडे, सीईओ प्रजित नायर, जिल्हा पोलिस प्रमुख सौरभ कुमार अग्रवाल, सेवानिवृत्त उप मुख्य कार्य अधिकारी राजेंद्र पराडकर, भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, आंगणे कुटुंबिय अध्यक्ष भास्कर आंगणे, सरपंच मानसी पालव, उपरपंच समीक्षा आंगणे, तहसीलदार वर्षा झालटे, आदी अधिकारी व स्थानिक भाजप पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
चव्हाण (Ravindra Chavan) म्हणाले, नवसाला पावणारी भक्तवत्सल श्री देवी भराडी आईचे दर्शन घेतले. भराडी आईच्या कृपेने देवस्थानाची ख्याती वर्षागणिक वाढत चालली आहे. भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्या देवी भराडीने संपूर्ण आंगणेवाडी पावन केले आहे. भराडी आईचा दरवर्षी साजरा होणारा यात्रोत्सव म्हणजे भक्तांचा मेळा असतो. भक्तांच्या वाढत्या संख्येला पुरेशा सुविधा येथे उपलब्ध झाल्या पाहिजेत. हे श्री भराडीआईचा भक्त म्हणून माझे कर्तव्यच आहे. याच अनुषंगाने या परिसरात आधुनिक स्वच्छतागृह उभारले आहेत. आंगणेवाडीसाठी यापुढेही निधीची कोणतीही कमी पडू देणार नाही, असा शब्दही त्यांनी दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मोदी है तो मुनकीन है! या वाक्याची प्रचिती देशभर येत आहे. राम मंदिरसारखा पाचशे वर्षे प्रलंबित प्रश्न मोदींनी सोडवला. जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन सुशोभित करण्याचे काम सुरू आहे. विमानतळवरही काम करण्यात येणार आहे, अशी माहितीही दिली. जिल्ह्याच्या विकासाची काळजी करू नका अशा शब्दात त्यांनी सिंधुदुर्ग आश्वस्त केले. सिंधुदुर्ग (Sindhudurg) मधील सर्व किल्यांचे संवर्धन होण्यासाठी भाजपची टीम काम करत आहे. बजेट मध्ये या किल्ल्यांच आदर्श पद्धतीने संवर्धन करण्यासाठी निधी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आलेला विकासनिधी अखर्चित ठेवू नका, अशी तंबीही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.