
Sindhudurg News : नुकतीच कुडाळ येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर आभार सभा पार पडली. शिवसेना आमदार नीलेश राणे यांनी या आभार सभेचे आयोजन केले होते. मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह शिवसेनेचे आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. पण माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर उपस्थित नव्हते. यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण ते त्यांच्या आजारपणामुळे सभेला उपस्थित नसल्याचे पुढे आले होते.
यानंतर आता पहिल्याच जाहीर कार्यक्रमात केसरकर यांनी मात्र आपल्या राजकीय वाटचालीवर वक्तव्य केल्याने कोकणासह राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दीपक केसरकर यांनी याआधीच आपल्या राजकीय नाराजीच्या अफवांवर स्पष्टीकरण देताना सर्व चर्चा धुडकावून लावल्या होत्या. तर "मी नाराज नाही, मागील अडीच वर्ष मी मंत्रिपदी होतो. त्यात मी खुश आहे. मला काम करण्यासाठी आमदारकीही पुरेशी आहे. इतरांनाही संधी मिळायला हवी. आता माझं वय वाढतं आहे. त्यामुळे आगामी काळात कुणीतरी उठून बाजूला व्हा म्हण्यापेक्षा आपणच आधीच बाजूला झालेलं चांगलं", अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर कुडाळमध्ये झालेल्या सभेला ते उपस्थित नसल्याने जास्तच चर्चा रंगल्या होत्या.
पण मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांना ह्रदय विकारचा त्रास जाणवत होता. यामुळे त्यांचे 'बायपास' ऑपरेशन करण्यात आले होते. आता प्रकृती ठीक झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या कामाला लागले असून सावंतवाडी मतदारसंघात 13 रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले. मात्र याच कार्यक्रमात त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे आता शिवसेनेत खळबळ उडाली आहे. केसरकर यांनी, राजकारण हे निवडणुकांपुरतं असते. पदाला चिकटून राहणारा मी नाही. यापुढे निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही, असे म्हणत राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
तसेच केसरकर यांनी केवळ जनतेची सेवा करणे हेच माझे कर्तव्य समजतो. याच जनतेच्या आशीर्वादाने काही दिवसांपूर्वी मला पुनर्जन्म मिळाला. त्यामुळे माझे हे जीवन मी जनतेसाठी समर्पित करत असल्याचेही केसरकर यांनी म्हटलं आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र आणि सिंधुदुर्ग दिनाचे औचित्यावर रुग्णांच्या सेवेसाठी केसरकरांच्या हस्ते 13 रुग्णवाहिकांचे लोकार्पण झाले.
यावेळी ते म्हणाले, ‘‘राजकारण हे लोकांसाठी असते, ते स्वतःसाठी नसते. मतं मिळावीत म्हणून चार रुग्णवाहिका आणून चार हजार लोकं गोळा करणारी लोकं आम्ही पाहिली आहेत. 80 टक्के समाजकारण आणि 20 राजकारण हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा मंत्र आहे. हा त्यांचा विचार असल्याने शिवसेनेनं यापूर्वी 9 रुग्णवाहिका दिल्या होत्या. सामाजिक कामात शिवसेना अग्रेसर असणारा पक्ष असून येथील रुग्णांना चांगली रुग्णसेवा मिळावी, यासाठी माझा प्रयत्न आहे. त्यासाठीच आताही 13 रुग्णवाहिका दिल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.