Vineet Singh Arrest : 'मी संविधान मानत नाही'; सोशल मीडियावर वारंवार पोस्ट, पोलिसांनी दाखवला कायद्याचा हिसका!

Kalyan police arrest fruit vendor Vineet Singh for repeatedly posting objectionable content against the Constitution on social Media : ठाणे जिल्ह्यातील कल्याण इथला फळ विक्रेता सोशल मीडियावर संविधानाचा अवमान करणाऱ्या पोस्ट करण्याचा प्रकार समोर आला आहे.
Vineet Singh Arrest
Vineet Singh Arrest Sarkarnama
Published on
Updated on

Thane news : सोशल मीडियावर वारंवार 'मी संविधान मानत नाही', अशा वेगवेगळ्या आशयाचे आक्षेपार्ह स्टेटस ठेवून कायद्याचा अवमान करणाऱ्या व्यक्तीला कल्याण पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई ठाणे जिल्ह्यातील महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या पथकाने केली.

अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव विनीत सिंग, असे असून तो चिकनघर परिसरात राहतो. तिथेच परिसरात फळ विक्रीचा व्यवसाय करतो. मुळचा तो प्रयागराज इथला रहिवाशी आहे.

विनीत सिंग हा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने संविधानविरोधात आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करत होता. यामुळे सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता निर्माण झाली होती. काही स्थानिक जागरूक नागरिकांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण विनीत याने नागरिकांशी वाद घातला.

विनीत सिंग ऐकत नाही, म्हटल्यावर स्थानिक नागरिकांनी त्याची तक्रार महात्मा फुले पोलिसांकडे (Police) केली. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत महात्मा फुले पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत विनीत सिंग करत आक्षेपार्ह पोस्टच्या प्रकारात तथ्य आढळले. यानंतर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत, अटक केली.

Vineet Singh Arrest
Navi Mumbai crime : 24 तासांत रक्तरंजित नवी मुंबई! 3 हत्या, RTI कार्यकर्ता-बिल्डरवर गोळीबार

पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, सोशल मीडियावर आक्षेपार्ह किंवा कायद्याचा अवमान करणारे पोस्ट टाकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही स्थानिक पोलिसांनी दिला.

Vineet Singh Arrest
Amravati crime : धक्कादायक! 16 वर्षीय मुलीला टक्कल करून मारहाण; आई-वडिलांचा अमानुष कहर उघड

भारताचे संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हा दस्तऐवज मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी चौकट आहे. हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत.

कायदा काय सांगतो?

संविधानाचा अवमान करून, द्वेष, हिंसा भडकावणे, समाजात तणाव निर्माण करणे किंवा कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारे कृत्य असेल तरच गुन्हा ठरतो. अशा गुन्ह्यात दंड, तीन ते पाच वर्षांपर्यंत तुरूंगवास होऊ शकतो. तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार तांत्रिक पुरावे असल्यास त्या देखील शिक्षा होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com