Mumbra Hara Bana Denge : अगोदर 'कैसा हराया', 'मुंब्रा हरा बना देंगे'; पोलिसांची नोटीस अन् 'AIMIM'च्या सहर शेख यांचा माफीनामा!
Thane Municipal Election : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत बहु मुस्लिम असलेल्या मुंब्रा भागात 'AIMIM'ने विजय मिळवल्यानंतर सहर शेख यांनी, 'कैसा हराया', 'मुंब्रा हरा बना देंगे', असे विधान करत वाद ओढावून घेतला होता. सहर शेख यांच्या या विधानाचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले.
भाजपसह हिंदुत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने यांनी कारवाईसाठी निवेदन दिले. याची पोलिसांनी दखल घेत, कारवाईची नोटीस बजावल्यानंतर, सहर शेख यांनी लेखी माफीनामा सादर केला आहे. या माफीनाम्याची चर्चा आता रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक असलेल्या मुंब्रा इथल्या सहर शेख यांना 'AIMIM'ने कडून महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागलं. निवडणूक लढल्या अन् जिंकल्या. यानंतर मुंब्रा इथं विजयी सभेत, 'कैसा हराया' हे त्यांचे विधान समाज माध्यमांवर चांगलच व्हायरल झालं. त्यानंतर 'मुंब्रा हरा बना देंगे', हे देखील त्यांचे विधानाने वाद निर्माण झाला.
सहर शेख यांच्या विधानावर हिंदुत्ववादी (Hindutva) संघटना आक्रमक झाल्या. भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांनी आक्षेप घेतला. स्थानिक पोलिसांना निवेदन देत कारवाईची मागणी केली. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांची भेट घेत कारवाईची मागणी केली.
पोलिसांनी यावर सहर शेख आणि तिचे वडील युनूश शेख यांना नोटीस बजावल्या होत्या. चिथावणीखोर वक्तव्य करू, नये ज्यामुळे समाजात असंतोष निर्माण होईल. राष्ट्रीय एकात्मतेला बाधा येईल तसेच स्टेटमेंट सार्वजनिक आणि सोशल मीडियावर देखील करू नका, असं म्हणत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 168 नुसार मुंब्रा पोलिसांनी सहर शेख यांना तातडीची नोटीस बजावली होती. तातडीच्या दोन नोटिसांनंतर सहर शेख यांनी आपला लेखी माफीनामा सादर केला आहे.
माफीनाम्यात काय?
सहर शेख यांचा मुंब्रा पोलिसांनी जबाब नोंदवला असून, त्यात त्यांनी माझ्या पक्षाच्या चिन्हामध्ये हिरवा रंग आहे. त्याअनुषंगाने मी विधान केलं होते. तरी 'AIMIM'च्या सभेत कोणाच्या भावना दुखवल्या असतील, तर मी जाहीरपणे आणि लेखी माफी मागते, असे म्हटले आहे.
किरीट सोमय्यांकडून पाठपुरावा
सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख यांनी केलेल्या विधानानंतर, भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाचा पोलिसांकडे पाठपुरावा केला. पोलिसांनी काय कारवाई केली, याची माहिती स्वतः जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले, असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

