NCP : अजितदादांनी टायमिंग साधलं! शिवसेनेत शाखेसाठी लढणारा शिलेदार राष्ट्रवादीत; भाजपचीही वाढवली डोकेदुखी

Thane Municipal Election: Ajit Pawar NCP Gives Tickets to Eknath Shinde ShivSena, BJP Rebels : ठाणे महापालिका निवडणुकीत महायुतीमधील नाराजीनाट्य उफाळलं असून, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय रणनीतीने मित्रपक्षांची डोकेदुखी वाढवली आहे.
Ajit Pawar NCP
Ajit Pawar NCPSarkarnama
Published on
Updated on

Thane Municipal Corporation election : ठाणे महापालिकेत एकनाथ शिंदे शिवसेना आणि भाजप एकत्र लढत असली, तरी या दोन्ही पक्षांमधील नाराजांची संख्या वाढली आहे. उमेदवारी न मिळाल्याने ठाण्यात स्वबळावर लढणारी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत शिंदे शिवसेना आणि भाजपमधील नाराजांचं इनकमिंग वाढलं असून, पुढं निवडणुकीत हा नाराज शिंदे शिवसेना-भाजप युतीला मोठं आव्हान उभं करतील, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या मुंब्रा इथल्या4 माजी नगरसेवकांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं आहे. राजन किणे, अनिता किणे, मोरेश्वर किणे, या सर्वच माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा एबी फॉर्म स्वीकारला आहे. महापालिका निवडणुकींना एकनाथ शिंदेंची साथ सोडत राष्ट्रवादी अजित पवार पक्षातून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याने हा स्थानिक पातळीवर मोठा धक्का मानला जात आहे.

मुंब्रा इथल्या शिवसेना (Shivsena) शाखा वादामध्ये राजन किणे यांचा मोठा सहभाग होता. मुंब्रा मध्ये शिवसेनेला वाढवण्यामध्ये त्यांचे मोठं योगदान आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मुंब्रातील राजकीय खेळी बदलण्याची शक्यता आहे. परंतु या खेळीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना रोखण्यासाठी महायुतीची खेळी असल्याची छुपी चर्चा आहे.

Ajit Pawar NCP
Vikram Rathod Quits ShivSenaUBT : शिंदे पक्षप्रमुख, खरी शिवसेना त्यांचीच, 'मविआ'कडून चक्कर मारून येताच, राठोडांची मोठी घोषणा; नीलेश लंकेंनी एका वाक्यात विषय संपवला!

तसंच भाजपचे माजी नगरसेवक राजकुमार यादव, केवलादेवी यादव, महेंद्र सोडारी आणि वर्षा पाटील या माजी नगरसेवकांनी जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला व महाराष्ट्र प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या उपस्थितीत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या चार जणांना प्रवेश करतानाच, महापालिका निवडणुकीसाठी एबी फॉर्म देण्यात आला.

Ajit Pawar NCP
Mahapalika Nivadnuk: एकनाथ शिंदेंच्या होमग्राऊंडवर अस्वस्थता; सभागृह नेत्याच्या पत्राने खळबळ,पदाधिकाऱ्यांचेही राजीनामे

भाजप आमदाराने तिकिटं विकली

भारतीय जनता पक्षात योग्य तो मानसन्मान न मिळाल्याने व आमचे तिकिट भाजप आमदाराने विकल्याचा गंभीर आरोप या चौघांनी केल्याने खळबळ उडाली आहे. नाराजींची फौज आमच्या संपर्कात आहेत, आगे आगे देखो क्या होता है, असा सूचक इशारा यावेळी नजीब मुल्ला यांनी दिला.

नाराजांमुळे अजितदादांन चांगले दिवस

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने ठाण्यात दिलेल्या स्वबळाच्या राजकीय खेळीमुळे आतापर्यंत एकनाथ शिंदे शिवसेना, भाजप, शिवसेना उद्धव ठाकरे सेना पक्ष व मनसे, अशा सर्वच नाराज पक्षाच्या कार्यकर्त्यांचा कौल हा, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडे वाढताना दिसतो आहे.

शिवसेना-भाजप किती जागा लढणार

ठाणे महापालिकेत महायुतीमधील भाजप अन् एकनाथ शिंदे एकत्र लढत आहे. या दोघांचा जागा वाटपाचा अधिकृत फॉर्म्युला समोर आला आहे. ठाण्यातील जागा वाटपात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आपला वरचष्मा कायम राखला आहे. ठाण्यात शिंदेंची शिवसेना 87 आणि भाजप 40 जागांवर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com