

MNS News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला, तर विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता.या निवडणुकीत विशेष म्हणजे त्यांनी दौरे,भेटीगाठी,सभा,बैठका,मेळावे यांसह पूर्ण ताकद लावत स्वतंत्रपणे उमेदवार दिले. पण गेल्या विधानसभेपेक्षा अधिकच निराशा त्यांच्या यावेळेला पदरी आली,कारण एकही उमेदवार त्यांचा निवडून आला नाही. आता महापालिका निवडणुकीतही राज ठाकरेंचा करिष्मा चाललाच नसल्याचं 'EXIT POLL'अंदाजात समोर येत आहेत.
राज ठाकरेंनी (Raj Thackeray) 20 वर्षांपासूनचे राजकीय मतभेद बाजूला ठेवत उद्धव ठाकरेंसोबत जुळवून घेत मोठं पाऊल उचलले. यानंतर ठाकरे बंधूंनी मराठी आणि अदानीच्या मुद्द्यांवरुन सत्ताधारी भाजपसह महायुतीला घेरण्यासाठी जोरदार ताकद लावली.पण मुंबईत भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसमोर तगडं आव्हान उभं करण्यात यश आल्याची चर्चा असतानाच मतदानानंतर समोर आलेल्या 'एक्झिट पोल'मध्ये मनसेबाबत धक्कादायक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी गुरुवारी(ता.16) मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता एक्झिट पोलची आकडेवारी समोर येण्यास सुरूवात आली आहे.या आकडेवारीनुसार सध्या तरी पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीत भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही जोरदार मुसंडी मारल्याचं दिसून येत आहे.पण राज ठाकरेंच्या मनसेच्या पदरी पुन्हा अपयशच आल्याचं पाहायला मिळतंय.
तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिष्ठा लागलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. कारण शिवतीर्थावरील सभेनंतर वारं फिरल्याची आणि ठाकरे बंधूंसाठी मुंबईत अनुकूल वातावरण तयार झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. पण आता महापालिका निवडणुकीसाठीचे मतदान पूर्ण झाल्यानंतर ठाकरे बंधूंची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर आला आहे.
मुंबईत महापालिकेच्या 227 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 127 ते 155 जागा घेत भाजप सत्तेत येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेला 54-65 जागा मिळण्याचा अंदाज आहे. मनसेला (MNS) फक्त 6-10 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर इतर उर्वरित 28 महापालिका निवडणुकीत मनसेला किती जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, जाणून घेऊयात.
मुंबई- 10
नवी मुंबई-01
उल्हासनगर-02
चंद्रपूर -01
नाशिक-02
धुळे-01
पुणे- 02
पिंपरी चिंचवड- 02
ठाणे- 02
कल्याण-डोंबिवली- 06
नागपूर- 01
वसई-विरार- 02
पनवेल- 01
कोल्हापूर- 00
सांगली-00
अमरावती-00
सोलापूर-00
छत्रपती संभाजीनगर-00
इचलकरंजी-00
मालेगाव-00
नांदेड-00
लातूर-00
अकोला-00
मीरा भाईंदर-00
भिवंडी-00
अहिल्यानगर-00
जळगाव-00
परभणी-00
जालना-00
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.