Raj Thackeray Speech : बारसूत रिफायनरी प्रकल्पच होऊ शकत नाही; राज ठाकरेंनी सांगितले कारण...

Barsu Refinery Project : राज ठाकरे बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत स्पष्टच बोलले...
Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama

MNS News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज रत्नागिरीमध्ये सभा पार पडली. यावेळी त्यांनी राज्यातील विविध विषयांवर भाष्य केलं. याबरोबरच रिफायनरीच्या प्रकल्पावरही त्यांनी आपली भूमिका मांडली.

राज ठाकरे म्हणाले, "कातळशिल्पांच्या आसपास तीन किलोमीटरपर्यंत कुठलाच विकास प्रकल्प करता तेय नाही. बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या परिसरांत कातळशिल्प आहेत. त्यामुळे येथे रिफायनरी प्रकल्प होऊ शकत नाही. पण माझी कोकणातील नागरिकांना विनंती आहे की, यापुढे तुम्ही तुमची जमीन विकू नका", असं ते यावेळी म्हणाले.

Raj Thackeray
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार; समन्वय समितीचा सरकारला १४ मे चा 'अल्टिमेटम'

"बारसूमध्ये युनेस्कोला कातळशिल्प सापडली आहेत. युनेस्को हे जगभरातील अनेक वास्तूंचे जतन करत असते. येथे कातळशिल्प सापडली आहेत. त्यामुळे अशा वास्तूच्या आसपास कोणताही मोठा प्रकल्प होऊ शकत नाही. किंवा अशा ठिकाणी युनेस्कोच्या परवानगीशिवाय कोणतंही मोठं बांधकाम करता येत नाही", असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

Raj Thackeray
Raj Thackeray on NCP : मी काय बोललो हे न बघताच राष्ट्रवादीने आवई उठवली; राज ठाकरेंचा हल्लाबोल

"येथे जमिनी हडपणे, यातून पैसा कमवणं एवढंच येथील लोकप्रतिनिधींचे उद्दिष्ट आहे, हे जनतेने विसरून चालणार नाही. त्यामुळे माझी कोकणवासीयांना हात जोडून विनंतीय की, या सर्व लोकांना तुम्ही एकदा धडा शिकवा", असं म्हणत त्यांनी तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींवरही जोरदार निशाणा साधला.

(Edited by - Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com