Raj Thackeray on NCP : मी काय बोललो हे न बघताच राष्ट्रवादीने आवई उठवली; राज ठाकरेंचा हल्लाबोल

Raj Thackeray : "मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करेन असं तुम्हाला कधी वाटतं का?"
Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

MNS News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज रत्नागिरीमध्ये सभा पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकारणातून पायउतार होण्याच्या निर्णयावरून विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसने आवई उठवली की, अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यास राज ठाकरे यांचा विरोध आहे, मी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करेन असं कधी तुम्हाला वाटतं का?, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली.

Raj Thackeray
Uddhav Thackeray Attacks BJP : 'अब की बार भाजप तडीपार'; उद्धव ठाकरेंचा महाडमधून एल्गार

राज ठाकरे म्हणाले, "माझा मुद्दा एवढाच होता की महाराजांच्या समुद्रातील पुतळ्यावर दहा हजार कोटी रुपये खर्च करणार. त्यापेक्षा त्यांनी उभे केलेले गडकिल्ले हे महाराजांचे खरे स्मारक आहेत. त्या गडकिल्ल्यांचे आधी संवर्धन करा फक्त एवढंच माझं म्हणणं होतं. मात्र, माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला गेला".

"2014 च्या आधी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करणार असल्याची घोषणा केली होती. मी त्याबाबत काय बोललो हे लक्षात न घेताच राष्ट्रवादीने आवई उठवली होती.

राज ठाकरेंचा या पुतळ्याला विरोध आहे. पण मी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करेल असं वाटतं तुम्हाला? पण हे बोलणारे राष्ट्रवादी आणि शरद पवार हे महाराजांचे नाव घेत नाहीत, आणि ते मला बदनाम करणार", असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली.

Raj Thackeray
Raj Thackeray: शरद पवारांनी राजीनामा दिला तेव्हा अजित पवारांना आतून उकळ्या फुटत होत्या; राज ठाकरेंचा टोला

आता दुसरीकडे राजीनाम्याचा विषय सुरू होता तो संपला. मला वाटतं की त्यांना (शरद पवार यांना) राजीनामा द्यायचा होता. पण ज्यावेळी राजीनामा द्यायचं जाहिर केलं त्यावेळी अजित पवार कसे बोलत होते? ज्या पद्धतीने अजित पवार बोलत होते ते पाहून शरद पवारांनी राजीमाना माघे घेतला असावा".

"अजित पवार ज्या पद्धतीने अरेरावी करत होते ते पाहून पवार साहेबांच्या मनात विचार आला असणार की राजीनामा दिल्या दिल्याची घोषणा केली तर हा इतका उर्मट वागतोय तर खरंच राजीनामा दिला तर कसा वागेल, म्हणून राजीनामा मागे घेतला असणार", असा टोला राज ठाकरे यांनी अजित पवार यांना लगावला.

(Edited by - Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com