Solapur Politics : सोलापुरातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे अखेर ‘हातात हात’ : रोहित पवारांचा पुढाकार

वाद नाहक वाढत असल्याचे पाहून आमदार रोहित पवार यांनीच पुढाकर घेत आमदार प्रणिती शिंदे या आपल्या मोठ्या भगिनी आहेत. त्यांना मला बोलण्याचा अधिकार आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपापसांत भांडू नये, असे आवाहन केले होते.
Rohit Pawar-Praniti Shinde
Rohit Pawar-Praniti ShindeSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूर (Solapur) लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पेटलेल्या वादावर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या पोस्टनंतर दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून आज (ता. ११ फेब्रुवारी) पडदा टाकण्यात आला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन भाजपबरेाबर एकदिलाने लढण्याचा निर्धारही केला. (After Rohit Pawar's tweet, the dispute between Congress and ncp in Solapur was resolved)

सोलापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा, अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले हेाते. त्याला उत्तर म्हणून काँग्रेसकडून आम्ही सोलापूर राष्ट्रवादीला सोडला, तर बारामती आणि कर्जत जामखेड काँग्रेसला देणार का, असा सवाल केला होता. तसेच, आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी तर कोण रोहित पवार, असा प्रश्न करत पोरकटपणा असतो काही लोकांमध्ये. आमदार म्हणून त्यांची पहिलीच टर्म आहे. त्यांना थोडे दिवस दिले की मॅच्युरिटी येईल’ असे खडे बोल सुनावले हेाते. त्यानंतर सोलापुरात काँग्रेस-राष्ट्रवादीत संघर्ष पेटला होता.

Rohit Pawar-Praniti Shinde
Baramati News : मोदी सरकारच्या निर्णयामुळे बारामतीच्या ‘माळेगाव’चा ३१९ कोटींचा टॅक्स माफ; साडेपाच कोटी व्याजासह परत मिळणार

सोलापूरच्या जागेवरून सुरू असलेल्या वादावर राजकीय वर्तुळातील अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. हा मतदारसंघ जिंकायचा असेल तर दोन्ही काँग्रेसने वाद टाळायला हवेत, अशी भावना व्यक्त होत असतना ही पक्षाचे काही जबाबदार पदाधिकारी बेजबाबदार वक्तव्य करीत होते, त्यामुळे काहींकडून उघडपणे नाराजी व्यक्त होत होती.

Rohit Pawar-Praniti Shinde
Laluprasad Yadav News : श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी.... लालूंच्या प्रकृतीबाबत मुलीने दिली महत्वपूर्ण अपडेट

वाद नाहक वाढत असल्याचे पाहून आमदार रोहित पवार यांनीच पुढाकर घेत आमदार प्रणिती शिंदे या आपल्या मोठ्या भगिनी आहेत. त्यांना मला बोलण्याचा अधिकार आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपापसांत भांडू नये, असे आवाहन केले होते. त्यानंतर दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, आमदार प्रणिती शिंदे ताईंच्या वक्तव्यावरून नाराज झालेले कार्यकर्ते आपला राग व्यक्त करतायेत. पण, कुणीही नाराज होऊ नये. त्या माझ्या मोठ्या भगिनी असून त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळं आपापसात वाद न करता बेरोजगारी हा आजचा मुख्य प्रश्न सोडवण्यासाठी आपण आपली शक्ती खर्च करूया! राहिला प्रश्न सोलापूरच्या जागेचा, तर त्यासंदर्भात दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील. मी कुठलाही दावा केला नव्हता. मी केवळ सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवली होती.

Rohit Pawar-Praniti Shinde
BJP News : शिवसेनेच्या ‘त्या २० टक्के’ मतांसाठी भाजपचे आक्रमक डावपेच : कार्यकारिणीत ठरली रणनीती

आमदार रोहित पवारांनी ट्विट केल्यानंतर काँग्रेस सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीविरूध्द घोषणाबाजी व रोहित पवार यांच्याबद्दल काहीही वक्तव्य करू नये, असे आवाहन केले. त्याचवेळी आपला खरा राजकीय शत्रू भाजप असून त्यांच्याविरूद्ध लढण्यासाठी आपली ताकद खर्च करूया, आपल्याआपल्यात भांडण नको, असेही त्यांनी कार्यर्त्यांना स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com