Kudal Malvan Constituency: आमदार वैभव नाईकांची धाकधूक वाढली; कुडाळ विधानसभा मतदारसंघात...

News Arena India Survey: कुडाळ-मालवणचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचे टेन्शन वाढले; 'न्यूज एरेना इंडिया'चा सर्व्हे काय सांगतो?
Vaibhav Naik - BJP
Vaibhav Naik - BJPSarkarnama
Published on
Updated on

Konkan Survey : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील प्रमुख पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. यासाठी बैठका, दौरे, मेळाव्यांचा सपाटा सर्वच राजकीय पक्षांनी लावला आहे. तर आगामी निवडणुकीत आपल्याच पक्षाला जास्त जागा मिळतील, असा दावा प्रत्येक राजकीय पक्षांकडून केला जात आहे. असे असतानाच आता राज्यात 'न्यूज एरेना इंडिया' या संस्थेचा सर्व्हे समोर आला आहे.

या सर्व्हेच्या माध्यमातून आगामी विधानसभेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदे गट) युतीच्या जास्त जागा येतील, असा दावा करण्यात आला आहे. तसेच राज्यात पुन्हा एकदा भाजप-शिवसेना युतीची सत्ता येणार असल्याचं 'न्यूज एरेना'ने म्हटलं आहे. या संस्थेनं आजच्या घडीला महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर कोण किती जागा जिंकणार याविषयीचा अंदाज व्यक्त केला आहे.

Vaibhav Naik - BJP
Konkan Vidhansabha Survey: कोकणात सर्वात मोठा पक्ष भाजप; शिवसेना अन् ठाकरे गटाचं काय? सर्व्हेतून आकडेवारी समोर

राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघाचा सर्व्हे करत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज व्यक्त केला आहे. या सर्व्हेनुसार कोकणात भाजपला 29-33 जागा, तर शिंदे शिवसेनेला 11, ठाकरे गटाला 14 ते 16, काँग्रेसला 5 ते 6, राष्ट्रवादी काँग्रेसला 7-8 आणि इतर 5 जागा मिळतील, असा दावा केला आहे.

या सर्व्हेने, कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचे टेन्शन वाढवले आहे. कारण या सर्व्हेनुसार कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीत या जागेवर भाजप विजयी होईल, असा दावा करण्यात आला आहे.

त्यामुळे आमदार वैभव नाईकांसाठी ही धोक्याची घंटा आहे. भाजपचे नेते नारायण राणे यांचा पराभव करत याच मतदारसंघातून वैभव नाईक शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार म्हणून पुढे आले. मात्र, आता या सर्व्हेने आमदार वैभव नाईकांची धाकधूक वाढवली आहे.

Vaibhav Naik - BJP
News Arena India Survey - Vidarbha: विदर्भात भाजपाला सर्वाधिक जागा; काँग्रेसलाही फायदा, ठाकरेंना फटका...

सिंधुदुर्गमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?

- सिंधुदुर्ग - भाजप : 2, शिवसेना (शिंदे गट) 1

- कणकवली : भाजप

- कुडाळ : भाजप

- सावंतवाडी : शिवसेना (शिंदे गट)

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com