
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आता झाल्या तर भाजपाला सव्वाशे जागा मिळतील, असा अंदाज 'न्यूज अरेना इंडिया' या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मिळाली असून राज्यातील तब्बल ३५ टक्के लोकांनी त्यांना पसंती दर्शवली आहे.
या सर्व्हेनुसार विदर्भात विधानसभेच्या एकून ६२ जागा आहेत. विदर्भात भाजपाला या सर्व्हेनुसार ३० ते ३१ जागा दाखवल्या आहेत. तर शिवसेना (शिंदे गट) अवघ्या पाच जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसताना दिसत आहे. त्यांना एकही जागा मिळणार नसल्याचे म्हटले आहे.
तर काँग्रेसला (Congress) २० ते २१ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसलाही अवघ्या दोन जागा दाखवण्यात आल्या आहेत. तर इतर पक्षांना ४ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भामध्ये सर्व्हेनुसार सगळ्यात मोठा पक्ष भाजपा तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस आहे.
भाजपला (BJP) आत्तापर्यंत सर्वाधिक म्हणजे १२३ ते १२९ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) ५५, तर काँग्रेसला ५० ते ५३ जागा मिळणे अपेक्षित आहे. शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाला १७ ते १९ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढविली, तर काँग्रेसला सर्वाधिक फायदा होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
न्यूज अरेनाच्या या सर्वेक्षणानुसार, आगामी विधानसभा निवडणुकीत कोणआला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी मतदारांची कुणाला सर्वाधिक पसंती आहे, याचीही माहिती या ट्वीटमध्ये देण्यात आली आहे. त्यानुसार, सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 35 टक्के तर काँग्रेसचे अशोक चव्हाण यांना 21 टक्के तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांना 14 टक्के आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 12 टक्के लोकांची पसंती असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 9 टक्के लोकांची पसंती असल्याचे म्हटेल आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.