Mumbai : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. बैठका, दौरे, मेळावे, आऊटगोईंग आणि इन्कमिंगलाही वेग आला आहे. याचवेळी भाजप, शिवसेना (शिंदे गट) युती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीतील विजयाचा दावा केला जात आहे. मात्र, एका राज्यात पुन्हा एकदा भाजप-शिवसेना युतीतीच सत्ता येणार असल्याचा दावा एका संस्थेने सर्व्हेच्या माध्यमातून केला आहे.
'न्यूज एरेना इंडिया' (News Arena India) या संस्थेनं आजच्या घडीला महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर कोण किती जागा जिंकणार याविषयीचा अंदाज व्यक्त केला आहे. यामध्ये राज्यातील राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघाचा सर्व्हे करत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज व्यक्त केला आहे.
राज्यात भाजपला जवळपास 123 ते 129 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेला ठाकरे गटापेक्षा अधिक जागा मिळणार असल्याचा दावा केला आहे. यात शिंदे गटाला 25 तर ठाकरेंना 17 ते 19 जागा मिळणार असल्याचं म्हटलं आहे. तर राष्ट्रवादीला 55 ते 56 आणि काँग्रेसला 50 ते 55 जागा मिळणार असल्याचं दावा केला आहे.
कोकणात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक संस्थांचे सर्व्हे पुढे येत आहेत. आता 'न्यूज एरेना' या संस्थेचा सर्व्हे समोर आला आहे. या संस्थेने राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघाचा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार कोकणामध्ये भाजपला 29-33 जागा, तर शिंदे शिवसेनेला 11, ठाकरे गटाला 14 ते 16, काँग्रेसला 5 ते 6, राष्ट्रवादी काँग्रेसला 7-8 आणि इतर 5 जागा मिळतील, असा दावा करण्यात आला आहे.
ठाण्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?
- ठाणे (18 जागा)
- भाजप : 8-10
- शिवसेना (शिंदे गट) : 5
- शिवसेना (UBT): 1-2
- राष्ट्रवादी : 2-3
पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?
रत्नागिरीत भाजप 2, राष्ट्रवादी 2, शिवसेना (UBT) 2, इतर 1, तर पालघरमध्ये भाजपला 1, शिवसेना (शिंदे गट) 1, राष्ट्रवादी 1, इतर 3 मिळतील असा दावा या सर्व्हेत करण्यात आला आहे. सिंधुदुर्गमध्ये भाजप 2, शिवसेना (शिंदे गट) 1 असा दावा करण्यात आला आहे.
Edited By : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.