Aurangabad : जी-२० आंतरराष्ट्रीय परिषदेच्या अनुषंगाने शहरात (विमेन्स 20) परिषद होणार आहे. या परिषदेसाठी अनेक देशाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय (Astikkumar Pandey) यांच्या अध्यक्षतेखाली आणि विमेन्स 20 परिषदेच्या मुख्य समन्वयक धरित्री पटनायक यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजनाबाबत आढावा घेण्यात आला.
जी-२० परिषद बैठकीच्या अनुषंगाने विविध समित्या नेमण्यात आल्या आहेत. या समितींच्या माध्यमातून करण्यात आलेल्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी (Collector) आणि मुख्य समन्वयकांनी आढावा घेतला. (Aurangabad) नियोजनात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत, प्रत्येकांनी आपल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाव्यात असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिले.
या भेटी दरम्यान त्यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळच्या वेरूळ अभ्यागत केंद्रास भेट दिली. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी अभ्यागत केंद्राची सविस्तर माहिती दिली.
जी-२० परिषदेत येणारे शिष्टमंडळ वेरूळ येथे भेट देणार असून या ठिकाणी त्यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि औरंगाबाद शहराच्या ऐतिहासिक बाजूची ओळख करून देण्यात येणार आहे. वेरूळ अभ्यागत केंद्रामध्ये असलेल्या सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर या ठिकाणी पाहुण्याच्या जेवणासाठी खास महाराष्ट्रीयन पद्धतीने व्यवस्था करण्यात येणार आहे. जी-२० परिषदेच्या निमित्ताने येत्या २६ ते २८ दरम्यान दीडशे विदेशी तर ५० भारतीय पाहुणे औरंगाबाद शहरात येत आहेत. २५ फेब्रुवारीपासूनच त्यांचे आगमन शहरात होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.