Chinchwad By-Election : अपक्ष कलाटेंचा प्रचार करणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांवर कारवाईचा बावनकुळेंचा इशारा!

Chinchwad By-Election : `चिंचवड`ला भाजप ऐतिहासिक विजय मिळविणार असल्याचा बावनकुळेंचा दावा
Chinchwad By-Election :
Chinchwad By-Election :Sarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार अश्विनी जगताप ५१ टक्के मते घेऊन ऐतिहासिक विजय मिळवणार असल्याचा दावा, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आज केला. या मतदारसंघाचा प्रचार दौरा केल्यानंतर पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

Chinchwad By-Election :
Shivsena : उद्धव ठाकरेंकडे राहणार फक्त पाच आमदार, विदर्भातील ‘या’ खासदारांनी केला दावा !

कसबा पेठच्या पोटनिवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे बावनकुळेंनी एका प्रश्नाला उत्तर देताना कबूल केले. पक्षाचे पुण्यातील अत्यवस्थ खासदार गिरीश बापट यांना प्रचारासाठी का बाहेर काढताय, असे विचारले असता त्यांनी प्रथम बापट हे अत्यवस्थ नसून, त्यांना बरे वाटत असल्याचा खुलासा केला. तर, प्रतिष्ठा पणास लागते, तेव्हा सर्वच जण कामाला लागतात. राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीत ते दिसले आहे. त्यामुळे खासदार बापटही त्यांच्या परीने सहकार्य करतील,असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

Chinchwad By-Election :
Aurangabad News : 'धाराशीव'बाबत अडचण नाही, मात्र औरंगाबादचं नामांतर केंद्राने ठेवले वेटिंगवर!

भाजपचे काही नगरसेवक हे शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार राहूल कलाटे यांचा प्रचार करीत असल्याबद्दल विचारले असता, अपक्षांचे काम करणाऱ्या पक्षाच्या नगरसेवकांवर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा बावनकुळे यांनी यावेळी दिला.

कलाटे यांना भाजपनेच अपक्ष म्हणून उभे केले असल्याच्या अजित पवार यांच्या सूचक वक्तव्यावर आम्हाला कलाटेंना अपक्ष उभे करण्य़ाची काहीच गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपचे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी काल पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने ही पक्षाला गळती लागली आहे, का असे विचारले असता, ही गळती नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यामुळे काहीही फरक पडत नाही, असेही ते म्हणाले.

गडकरी,राणे प्रचाराला येणार नाहीत :

या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीने वीस,तर भाजपने चाळीस स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली आहे. पण,त्यातील भाजपचे स्टार प्रचारक असलेले नितीन गडकरी, नारायण राणे आदी केंद्रीयमंत्री प्रचाराला येणार नाहीत,असे बावनकुळे यांनी सांगितले.स्थानिक आणि राज्य पातळीवरील पक्षाचे नेते प्रचार करणार आहेत.असे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com