Torrent Power Project : टोरंट पॉवर प्रकल्पावरून सरकारची कोंडी? भाजपमध्येच मतभेद? मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणानंतरही जेष्ठ नेत्याचा सरकारला घरचा आहेर!

Sudhir Mungantiwar On Karjat Torrent Power Project : कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरंट पॉवरच्या पंपस्टोरेज प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीचा मुद्दा चांगलाच तापला असून विरोधक या मुद्यावरुन चांगलेच आक्रमक झाले आहेत. दरम्यान भाजपच्या बड्या नेत्यानेच सरकारला घरचा आहेर दिला आहे.
Karjat Torrent Power Project Tree Cutting Controversy; CM Devendra Fadnavis
Karjat Torrent Power Project Tree Cutting Controversy; CM Devendra Fadnavissarkarnama
Published on: 
Updated on: 

Raigad News : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरंट पॉवरच्या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पावरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीवरून विरोधक आणि पर्यावरणप्रेमींनी राज्य सरकारला लक्ष्य केले असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावत हा प्रकल्प हरित ऊर्जा निर्मितीशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले होते.

मात्र, आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आवश्यक नसताना वृक्षतोड करू नये आणि पर्यायी जागेचा विचार करावा, अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील या मुद्द्यावरील भूमिकांबाबत चर्चा सुरू झाली आहे.

कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसरात टोरंट पॉवर कंपनीचा जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होण्याची शक्यता असल्याने पर्यावरणप्रेमी आणि स्थानिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. विरोधकांनीही या मुद्द्यावरून राज्य सरकारला घेरले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शेतकरी कामगार पक्षाने या प्रकल्पाविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे. आमदार आदित्य ठाकरे हेही प्रकल्पस्थळाला भेट देणार असल्याने या मुद्द्यावरील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Karjat Torrent Power Project Tree Cutting Controversy; CM Devendra Fadnavis
Torrent Power Karjat Project : कर्जतमधील वृक्षतोडीवरून हंगामा : CM फडणवीसांनी सुनावलं : "फेक नॅरेटिव्ह थांबवा, 90 हजार नवीन झाडं लावणार!"

सुधीर मुनगंटीवारांची मागणी

या वादात आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्षतोडीबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. आवश्यक नसताना वृक्षतोड करू नये, अशी वनविभागाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, प्रकल्पासाठी पर्यायी जागा उपलब्ध आहे का, याचाही विचार केला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाची भूमिकाही पर्यावरणाचे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे प्रकल्पासाठी जंगलतोड अपरिहार्य आहे का, याचा सखोल अभ्यास करण्याची गरज असल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.

मुनगंटीवार यांनी आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण देताना पर्यायी जागेच्या शक्यतेवर भर दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा प्रकल्प अन्य ठिकाणी उभारणे शक्य असेल, तर जंगल नष्ट होण्यापासून वाचवले पाहिजे. वृक्षतोड कशी टाळता येईल, यासाठी शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी वृक्षतोडीबाबत भूमिका स्पष्ट केल्याचा उल्लेख करत मुनगंटीवार यांनी वनविभागाची भूमिका आणि पर्यायी जागेचा विचार करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. त्यामुळे प्रकल्पाच्या ठिकाणाबाबत आणि पर्यावरणीय परिणामांबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

फडणवीसांच्या विधानानंतर चर्चेला उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांवर ‘फेक नरेटिव्ह’ पसरवल्याचा आरोप केला होता. हा प्रकल्प हरित ऊर्जा निर्मितीशी संबंधित असून तो पर्यावरणपूरक असल्याची भूमिका त्यांनी मांडली होती. मात्र, आता भाजपचेच ज्येष्ठ नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आवश्यक नसताना वृक्षतोड टाळण्याची आणि पर्यायी जागेचा विचार करण्याची भूमिका घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. विरोधकांकडून या विधानाचा सरकारवर टीका करण्यासाठी वापर होण्याची शक्यता आहे.

Karjat Torrent Power Project Tree Cutting Controversy; CM Devendra Fadnavis
Devendra Fadnavis: कर्जतमध्ये शेकडो झाडांची वृक्षतोड', फडणवीसांनी सांगितलं कारण VIDEO

एकीकडे सरकारकडून प्रकल्पाचे समर्थन केले जात असताना दुसरीकडे पर्यावरणीय परिणाम आणि वृक्षतोडीची गरज याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे टोरंट पॉवर प्रकल्पाच्या भवितव्याबाबत, पर्यायी जागेच्या शक्यतेबाबत आणि वृक्षतोडीबाबत प्रशासन काय निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com