Uddhav Thackeray : "उद्धव ठाकरेंच्या व्यासपीठावरील नेते लवकरच नेतृत्व शिंदेंचं स्वीकारतील"

Uday Samant On Uddhav Thackeray : "मी बोलत नाही, संयम ठेवतो म्हणून माझ्याकडे काहीच नाही, असं समजू नये," असा इशाराही उदय सामंत यांनी ठाकरेंना दिला.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Rantagiri Sindhudurg : शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर होते. या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी मंत्री उदय सामंत यांना लक्ष्य केलं होतं. आता उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. "उद्धव ठाकरेंच्या व्यासपीठावरील नेते येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्विकारतील, याची त्यांनी नोंद घ्यावी," असा गौप्यस्फोट सामंत यांनी केला आहे.

Uddhav Thackeray
Jayant Patil : महाराष्ट्रात लोकसभा अन् विधानसभा निवडणूक एकाच वेळी; जयंत पाटलांना असं का वाटतंय?

"शिवाजी पार्कवर सभा घेणाऱ्या पक्षप्रमुखांना आता रस्त्यावरती मंडप घालून सभा घ्यावा लागतात. यापेक्षा आमच्या जिल्हा परिषद गटाचे मेळावेही दहापट मोठे होतात," असा टोला उदय सामंत ( Uday Samant ) यांनी ठाकरेंना लगावला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"...तर जनता ठाकरेंना उत्तर देईल"

"मी बोलत नाही, संयम ठेवतो म्हणून माझ्याकडे काहीच नाही, असं समजू नये. उद्धव ठाकरेंच्या टीकेला मी नाही तर जनता उत्तर देईल. उद्धव ठाकरेंच्या टीकेचं मला काहीही नवल वाटलं नाही. कार्यकर्ते टिकवणे आणि टाळ्या वाजवण्यासाठी त्यांना असं बोलावं लागतं," असं उदय सामंत यांनी म्हटलं.

Uddhav Thackeray
Jaykumar Gore Vs Ramraje Nimbalkar : जयकुमार गोरेंचं रामराजेंना आव्हान, म्हणाले 'हिंमत असेल तर..'

"ठाकरेंना पक्ष वाढवण्यासाठी शुभेच्छा"

"शिवाजी पार्कला सभा घेणारे रस्त्यावर आले. बोळात सभा घेणाऱ्यांनी आत्मचिंतन करावं. मी लाचारपणे उद्धव ठाकरेंकडे गेलो नाही. मला अडीच वर्षांपूर्वी ठाकरेंनी बोलावलं, हे त्यांनी शपथ घेऊन सांगावं. उद्धव ठाकरेंना पक्ष वाढवण्यासाठी शुभेच्छा," अशा शब्दांत उदय सामंतांनी उद्धव ठाकरेंचा ( Uday Samant Reply Uddhav Thackeray ) समाचार घेतला आहे.

Uddhav Thackeray
Kolhapur Loksabha : महाविकास आघाडीच्या उमेदवारीची गाडी छत्रपती घराण्याच्या स्टेशनवरच थांबणार

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

"2014 साली आल्यानंतर त्यांना ( उदय सामंत ) मी मंत्रीपदाचा शब्द दिला होता. मंत्री पदाचा मी माझा शब्द पाळला पण ज्यांनी मला शब्द दिला ते शब्दाला कमी पडले. मी तुम्हाला मंत्रीपद दिलं होतं. 2019 मध्येही त्यांना मंत्रीपद देण्याची तशी गरज नव्हती. कारण मी 2014 साली मंत्रीपदाचा दर्जा दिला होता. पण, आम्ही बाळासाहेबांचे पुत्र शब्दाचे पक्के. त्यांना बोलावून सांगितलं शब्द दिला होता तुम्ही विसरला असाल मी नाही विसरलो. 2019 मध्ये मी सांगितले जा आणि मंत्रीपदाची शपथ घ्या. त्यांनी घेतली आणि ते पळाले," अशी टीका उद्धव ठाकरेंनी उदय सामंत यांच्यावर केली होती.

( Edited By : Akshay Sabale )

Uddhav Thackeray
Ajit Pawar Controversial Statement : 'त्या' विधानावरुन अजितदादांचे ट्विट ; तर 'नाटकीबाज' लोकांना दिला इशारा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com