Kolhapur Loksabha : महाविकास आघाडीच्या उमेदवारीची गाडी छत्रपती घराण्याच्या स्टेशनवरच थांबणार

Mahavikas Aghadi News : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ हे भाजपसोबत गेल्याने महायुती अधिक बळकट झाली आहे.
Chhatrapati Shahu Maharaj-Sambaji Raje
Chhatrapati Shahu Maharaj-Sambaji RajeSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Politics : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा गुंता काही केल्या सुटेना. त्यामुळे चर्चेतले असलेले उमेदवार स्वार झालेत, तर इच्छुक बुचकळ्यात पडले आहेत. जिंकून येणारा उमेदवार हाती लागत नसल्यामुळे महाविकास आघाडीला कसरत करावी लागत आहे. अचानक काही नावे समोर येत असल्याने इच्छुकांची मात्र गोची होत आहे. (Mahavikas Aghadi is trying to field a candidate in the Chhatrapati family of Kolhapur)

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सक्षम आणि प्रभावी चेहऱ्याचा शोध सुरू आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीकडून कोल्हापूरची जागा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी लढवावी, अशी चर्चा सुरू होती. मात्र संभाजीराजे यांनी महाविकास आघाडीत प्रवेश घेण्यापेक्षा पुरस्कृत स्वराज्य संघटनेला उमेदवारी द्यावी, अशी मागणी करत प्रस्ताव फेटाळून लावला. संभाजीराजे छत्रपती आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चा थांबवत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचे नाव पुढे आणले. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे या नावावर एकमत झाल्याची माहिती समोर येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chhatrapati Shahu Maharaj-Sambaji Raje
Solapur Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोलापुरात मिळणार नवा चेहरा...

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याबाबत श्रीमंत शाहू महाराज यांनी यापूर्वी नकार दर्शवला असला तरी सध्याची त्यांची भूमिका काय? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीकडून व्ही. बी. पाटील, ठाकरे गटाकडून गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ. चेतन नरके, माजी आमदार संजय घाटगे, काँग्रेसकडून बाजीराव खाडे इच्छुक आहेत. यातील इच्छुकांनी पायाला भिंगरी बांधत मतदारांचे उंबरे झिजवायला सुरूवात केली आहे. मात्र, महाविकास आघाडीकडून खास करून काँग्रेसकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी आग्रह केला जात आहे.

सध्या या मतदारसंघात महाविकास आघाडीतील एकाही पक्षाकडे प्रभावी, सक्षम आणि जनमत असलेला चेहरा नाही. सध्या या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ हे भाजपसोबत गेल्याने महायुती अधिक बळकट झाली आहे. अशा परिस्थितीत महायुतीला टक्कर देण्यासाठी नवीन आणि जनमत असलेला चेहरा महाविकास आघाडीला देणे गरजेचे आहे. महाविकास आघाडी छत्रपती घराण्यात उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करत आहे.

Chhatrapati Shahu Maharaj-Sambaji Raje
Solapur NCP : पवारांच्या राष्ट्रवादीत खांदेपालट; सोलापूर शहराला 9 वर्षांनंतर मिळणार नवा अध्यक्ष...

छत्रपती घराण्यातीलच एक नाव पुढे घेऊन लोकसभा मतदारसंघात त्याचा आढावा घेतला जात असल्याची माहिती समोर येत आहे. संभाजी राजेंची भूमिका ठाम असल्याने त्यांच्या ठिकाणी श्रीमंत शाहू महाराज यांचे नाव घेतले जात आहे. पण, श्रीमंत शाहू महाराज यांची भूमिका काय असणार, हे गुलदस्त्यात आहे. त्यामुळे महाविकासला अजून तरी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात उमेद मिळालेली नाही.

Chhatrapati Shahu Maharaj-Sambaji Raje
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजेंची धरसोड भूमिका त्यांच्यासाठीच धोक्याची; मिळालेल्या संधी वाया?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com