Uddhav Thackeray News : साथी हो तो ऐसा..! मोदींची पवारांवर टीका, ठाकरेंचा जशास तसा पलटवार; अजितदादांच्या...

Uddhav Thackeray on pm Modi : पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा आणि शरद पवारांवरील टीकेचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला.
PM Modi, Uddhav Thackeray
PM Modi, Uddhav ThackeraySarkarnama
Published on: 
Updated on: 

Raigad Politics News : पंतप्रधान मोदी शिर्डीत येऊन गेले. शिर्डीतील सभेत मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?, असा सवाल करत मोदींनी टीका केली. आता या टीकेवरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधला. ते श्रीवर्धनमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

PM Modi, Uddhav Thackeray
Uddhav Thackeray News : दिल्लीपुढे झुकणाऱ्यांना सपाट करा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघात

पंतप्रधान महाराष्ट्रात येऊन गेले, शिर्डीला गेले. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न धुमसतोय. त्यावर पंतप्रधान बोलतील अशी अपेक्षा होती. कारण हा त्यांच्या अखत्यारितील प्रश्न आहे. पण त्याच्याबद्दल ते काहीच बोलले नाहीत. हे वैशिष्ट्य त्यांचं आहे. मणिपूर पेटतंय बोलायचं नाही. मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न आहे, लोक रस्त्यावर उतरलेत, तरुण आत्महत्या करत आहेत, पण जणू मी त्या गावचाच नाही, असं दाखवून कशावर तरी बोलून गेले, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एक गोष्ट पवारसाहेब तुमच्याही लक्षात आली असेल. काल त्यांनी ७० हजार कोटींचा उल्लेख केला नाही. ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा, अशी टीका त्यांनी राष्ट्रवादीवर केली होती. काल काहीच का बोलले नाहीत. कारण बाजूला अजित पवार बसलेले होते. हे सर्व थोतांड सुरू आहे. मग पवारसाहेबांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही, असं ते (पंतप्रधान मोदी) बोलले, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर दिलं.

मनमोहनसिंग पंतप्रधान असताना पवारसाहेब कृषिमंत्री होते. त्यावेळी पहिल्यांदा पवारसाहेबांनी शेतकऱ्यांना ७० हजार कोटींची कर्जमाफी केली होती, पण जणू काही आजपर्यंत कोणी काही केलेलंच नाही. मी आल्यावरच सर्व होतं, असा आभास निर्माण केला जातोय. लोकं एवढी काही मूर्ख नाहीत. सूडाचं राजकारण करायचं. किती सूड उगारणार? शेवटी शेतकऱ्याचा आसूड कडाडला की तिथे भले भले झोपून जातात. कारण सर्वसामान्यांच्या ताकदीपुढे कोणाचचं काही चालत नाही. सत्ताधारी किती माजला असला तरी त्याला सर्वसामान्यांपुढे झुकावचं लागतं. आणि हा आपल्या देशाचा इतिहास आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला.

PM Modi, Uddhav Thackeray
Supriya Sule News : मुंबईतील हजारो कोटींचा हिरे उद्योग सुरतला; सुप्रिया सुळेंचा भाजपवर वार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Uddhav Thackeray
kalyan dombvali palika
Benjamin Netyanahu Called Narendra Modi
Aaditya Thackeray