Ulhasnagar Co-opted Members Election : महापौरांच्या ‘दुटप्पी’ राजकीय खेळीवरून घमासान; भाजपपाठोपाठ शिवसेनेतही संतापाची ठिणगी

Ulhasnagar co-opted member election faces another delay as questions arise over Mayor Ashwini Nikam's role : 11 सप्टेंबरनंतर 24 सप्टेंबरची प्रक्रियाही लांबली; 42 इच्छुकांच्या उमेदवारीनंतर आता 1 ऑक्टोबरला तिसऱ्यांदा विशेष महासभा, शिवसेनेतही नाराजीची चर्चा
Ulhasnagar Co-opted Members Election
Ulhasnagar Co-opted Members ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

By, नवनीत बऱ्हाटे, उल्हासनगर बातमीदार

Ulhasnagar co-opted members election latest news : उल्हासनगर महापालिकेची विशेष महासभा बोलवायची महापौरांनीच, उमेदवारांचे अर्ज भरताना पुढे राहायचे महापौरांनीच आणि ऐन निवडीच्या तोंडावर न्यायालय गाठून प्रक्रियेला ब्रेकही महापौरांनीच लावायचा!

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या अश्विनी निकम यांच्या या 'दुटप्पी' भूमिकेमुळे उल्हासनगरच्या राजकारणात संतापाचा भडका उडाला असून, भाजपपाठोपाठ आता खुद्द शिवसेनेतूनही त्यांच्या कार्यपद्धती विरोधात नाराजीचे सूर तीव्र होऊ लागले आहेत.

उल्हासनगर महापालिकेतील (Municipal) सात स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा तिढा सुटण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचा बनत आहे. स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी प्रथम 11 सप्टेंबर रोजी विशेष महासभा बोलावण्यात आली होती. मात्र ही महासभा महापौरांच्या आदेशानुसार रद्द झाल्यानंतर प्रकरण न्यायालयात पोहोचले. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नव्याने प्रक्रिया राबवून 24 सप्टेंबर रोजी पुन्हा विशेष महासभा निश्चित करण्यात आली.

दुसऱ्या प्रक्रियेत सात जागांसाठी तब्बल 42 इच्छुकांनी अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे शिवसेनेच्या (Shivsena) इच्छुकांचे अर्ज सादर करताना महापौर अश्विनी निकम स्वतः आयुक्तांच्या दालनात उपस्थित होत्या. त्यामुळे यावेळी स्वीकृत सदस्यांची निवड मार्गी लागेल, अशी अपेक्षा इच्छुकांना होती. मात्र निवडीच्या तोंडावर पुन्हा न्यायालयीन घडामोडी घडल्या. महापौर अश्विनी निकम यांच्याकडून पुन्हा सर्वोच्च न्यायालयात मुदतवाढ मागण्यात आल्यानंतर 24 सप्टेंबरच्या निवडणूक प्रक्रियेला 'ब्रेक' लागला.

Ulhasnagar Co-opted Members Election
Top 10 News : मनोज जरांगेंनी 'डिफेंडर' परत पाठवली! ‘बापू’ पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर? Top Ten राजकीय घडामोडी

याच पार्श्वभूमीवर भाजपकडून महापौरांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात असून, वारंवार हुकणाऱ्या मुहूर्तामुळे शिवसेनेतील इच्छुकांमध्येही नाराजीची खदखद वाढल्याची चर्चा आहे. एकीकडे पक्षाच्या उमेदवारांसोबत अर्ज प्रक्रियेत सहभागी व्हायचे आणि दुसरीकडे निवड पुढे ढकलण्यासाठी न्यायालयीन मार्ग स्वीकारायचा, या भूमिकेवरून भाजपासह आता खुद्द शिवसेनेचे उमेदवार देखील महापौरांवर ‘दुटप्पी धोरणा’चा आरोप करीत आहेत. मात्र शिवसेनेकडून या नाराजीबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर झालेली नाही. याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी महापौरांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

Ulhasnagar Co-opted Members Election
Gujarat Congress Return : ‘बापू’ पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर? गुजरातच्या राजकारणात मोठी हालचाल

पुन्हा तिसऱ्यांदा विशेष महासभा!

दरम्यान, महापालिका सचिव डॉ. दिपाली चौगले यांनी 28 सप्टेंबर रोजी काढलेल्या नोटिसीनुसार आता महापौरांच्या आदेशाने 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.10 वाजता पुन्हा तिसऱ्यांदा विशेष महासभा बोलावण्यात आली आहे. त्यामुळे दोनदा हुकलेला स्वीकृत सदस्य निवडीचा मुहूर्त तिसऱ्यांदा तरी साधणार की पुन्हा नवे राजकीय नाट्य रंगणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com