

Party switching candidates Ulhasnagar : उल्हासनगर महापालिका निवडणुकीत, उमेदवारीची संधी मिळवण्यासाठी एका दिवसात तीन पक्षात प्रवेश केलेल्या उमेदवारांची चर्चा आहे. या चौघा उमेदवारांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून संधी मिळाली होती.
पण ती संधी त्यांनी डावलली अन् आता या उमेदवारांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शिलेदारांच्या प्रचाराची वेळ आली आहे. उमेदवारांनी वेगाने केलेल्या पक्षांतराची चर्चा महापालिका निवडणुकीत रंगली आहे.
उल्हासनगर महापालिका निवडणुकीत नीलेश बोबडे, रवी वसिटा, सुरज खारकर आणि दीप्ती उमाळे या चौघा उमेदवारांनी आपला पॅनल तयार केला. हे चौघे मूळ भाजपचे (BJP). त्यांनी भाजपकडून उमेदवारी मागितली. परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी जय महाराष्ट्र करत, भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजपमध्ये प्रवेश करताच, धनंजय बोडारे यांनी उमेदवार निश्चित केले. परिणामी, वरील चौघांचा हिरमोड झाला. त्यांनी लगेचच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट धरली. अजित पवार यांनी देखील लगेचच या चौघांना उमेदवारी जाहीर केली. पण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून या चौघांना काही शब्द मिळाला. त्यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेत, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. आता हे चौघे, शिंदेच्या शिवसेनेतील उमेदवारांच्या प्रचार रॅलीत फिरत आहेत.
अजित पवार राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांना डावलून बाहेरून आलेल्यांना संधी देण्यात आली. यामुळे अजितदादांच्या पक्षामध्ये देखील नाराजी वाढली आहे. पक्षातील कार्यकर्त्यांना उमेदवारी दिल्याने आमच्यावर अन्याय झाला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष नरेश गायकवाड यांनी दिली.
उल्हासनगरमध्ये भाजपचे धनंजय बोडारे यांच्याविरोधात एकनाथ शिंदे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरुण अशान उभे ठाकले आहेत. एकनाथ शिंदे शिवसेनेचे शहरप्रमुख रमेश चव्हाण, अजित पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री आणि भाजपचे अमर लुंड यांच्या बिग फाईट रंगणार आहे. त्यामुळे उल्हानगरच्या महापालिकेतील या लढतीकडे विशेष लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.