Vaibhav Khedekar : भाजपमध्ये प्रवेश करताच वैभव खेडेकरांचा नवा राजकीय डाव? थेट नगराध्यक्षपदावर दावा; शिंदेच्या शिवसनेत खळबळ

Khed Nagarparishad Election : रत्नागिरी जिल्ह्यात 4 नगर परिषदा आणि 3 नगर पंचायतींच्या निवडणुका लागल्या असून आज पासून नामांकन भरता येणार आहे.
Khed Nagarparishad Election; BJP Vaibhav Khedekars, Shivsena Uday Samant, Ramdas Kadam And Yogesh Kadam
Khed Nagarparishad Election; BJP Vaibhav Khedekars, Shivsena Uday Samant, Ramdas Kadam And Yogesh Kadamsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. वैभव खेडेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून पत्नी वैभवी खेडेकर यांचा “नगराध्यक्ष” म्हणून उल्लेख असलेला फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवला आहे.

  2. या कृतीमुळे उद्योगमंत्री उदय सामंत, रामदास कदम आणि मंत्री योगेश कदम यांच्या जिल्ह्यात भाजपने थेट आव्हान उभं केलं आहे.

  3. त्यामुळे महायुतीत अंतर्गत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Local Bodies Election News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. आजपासून प्रत्यक्ष नामांकन भरता येणार असून 17 तारखेपर्यंत याची मुदत असेल.याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली असतानाच मात्र महायुतीच्या गोटात मतभेद उफाळून येताना दिसत आहेत. उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह कदम पितापुत्रांना होम पिच असलेल्या जिल्ह्यातच भाजपने कडवे आव्हान निर्माण करण्यात सुरूवात केली आहे. येथे नुकताच भाजपवासी झालेल्या वैभव खेडेकर यांनी बायकोच्या (वैभवी) नगराध्यक्षपदासाठी हालचाली सुरू करत थेट दावाच केला आहे. यामुळे आता महायुतीतील कोकणातून बेबनाव समोर आल्याची चर्चा येथे रंगली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात 4 नगर परिषदा आणि 3 नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महायुती, महाविकास आघाडीत लढत होण्याची शक्यता असतानाच स्थानिक आघाड्याही नशीब आजमवणार आहेत. अशातच येथे महायुतीतील बेबनाव समोर आला असून भाजप विरूद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना असाच अनेक ठिकाणी सामना होण्याची आता शक्यता आहे.

आता या वादात खेड नगरपरिषदेची देखील भर पडली असून येथे नुकताच भाजपवासी झालेले वैभव खेडेकर यांनी नगराध्यक्ष पदावर दावा सांगितला आहे. त्यांनी आपल्या पत्नी वैभवी खेडेकर यांच्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे आता नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

Khed Nagarparishad Election; BJP Vaibhav Khedekars, Shivsena Uday Samant, Ramdas Kadam And Yogesh Kadam
Pooja Khedkar-Vaibhav Sable Case : पूजा खेडकरनंतर सांगलीच्या उपायुक्ताचाही MPSC ला चुना? कर्णबधीर प्रमाणपत्र खोटं, नव्या आरोपानं खळबळ

खेड नगरपरिषदेवर गेल्या अनेक वर्षांपासून रामदास कदम आणि योगेश कदम यांचे वर्चस्व राहिले असून येथे भगवा फडकावण्यासाठी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील लक्ष घातले आहे. पण आता खेडेकर यांच्याकडून कदम पितापुत्रासह थेट शिवसेनेच्या र्चस्वालाच आव्हान देण्यात आल्याने युतीच्या घोषणेआधीच येथे मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.

मनसेतून हकालपट्टी केलेल्या वैभव खेडेकर यांचा पक्ष प्रवेश चांगलाच चर्चेत आला होता. सलग तीन वेळा त्यांचा पक्षप्रवेश रखडला होता. यानंरत त्यांचा प्रवेश नुकताच झाला होता. यादरम्यान त्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसह खुद्द उदय सामंत यांनी देखील अप्रत्यक्ष शिवसेनेची ऑफर दिली होती.

तसेच खेडमध्ये झालेल्या कार्यक्रमात रामदास कदम यांनी देखील जाहीरपणे खेडेकर यांना जुने वाद विसरुन महायुतीसोबत येण्याची ऑफर दिली होती.पण ते भाजपमध्ये प्रवेश करण्यावर ठाम राहिले. आणि आता भाजपवासी होताच त्यांनी कदम पितापुत्राच्या वर्चस्वाला आव्हान देत थेट पत्नी वैभवी खेडेकर यांना नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरवले आहे.

दरम्यान शिंदेच्या शिवसेनेकडून देखील उमेदवार जाहीर करण्यात आला असून माधवी बुटाला यांचे नाव खेडच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून आघाडीवर आहे. पण खेडेकर यांनी आपल्या पत्नीचे नाव जाहीर केल्याने महायुतीमध्ये संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे. यामुळे आता हा वाद महायुतीतील नेते कसा थांबवतात? शिंदेंची शिवसेना काय पाऊल उचलणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Khed Nagarparishad Election; BJP Vaibhav Khedekars, Shivsena Uday Samant, Ramdas Kadam And Yogesh Kadam
Pooja Khedkar News : एका ट्विटमुळे समोर आला पूजा खेडकरचा 'कार'नामा, देशभर गाजलेल्या UPSC स्कॅमचा भांडाफोड करणारा वैभव नेमका कोण आहे?

FAQs :

1. वैभव खेडेकर यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला?
वैभव खेडेकर यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे.

2. वादाचं कारण काय आहे?
त्यांनी पत्नी वैभवी खेडेकर यांचा “नगराध्यक्ष” म्हणून उल्लेख असलेला स्टेटस ठेवला, ज्यामुळे महायुतीत उमेदवारीवरून वाद निर्माण झाला.

3. हा वाद कोणत्या जिल्ह्यात उभा राहिला आहे?
हा वाद उद्योगमंत्री उदय सामंत, रामदास कदम आणि मंत्री योगेश कदम यांच्या प्रभावक्षेत्रात उभा राहिला आहे.

4. महायुतीमध्ये संघर्षाची शक्यता का आहे?
भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतून वेगवेगळे उमेदवार समोर येत असल्याने संघर्ष निर्माण होऊ शकतो.

5. या घडामोडीचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होईल?
खेड नगरपालिका निवडणुकीत महायुतीची एकजूट धोक्यात येऊ शकते आणि भाजप-शिवसेना यांच्यात तणाव वाढू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com