
Sangli Political News: सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील 24 मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी सात लाख रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी मोठा करावाई करण्यात आली आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सांगली विभागाने कारवाई केली असून उपायुक्त वैभव विजय साबळे यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून खळबळही उडाली आहे.
यानंतर आता जिल्ह्यात उलट सुटल चर्चा सुरू असतानाच एका ट्विटने मात्र पूजा खेडकर प्रकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. ज्या प्रकारे पूजा खेडकरने अपंग प्रमाणपत्र जोडून युपीएससीला चुना लावला. त्याच पद्धतीने वैभव साबळे यांनी एमपीएससीला चुना लावल्याची चर्चा सुरू झाली आहे.
वैभव साबळे यांच्याबाबत आपचे राज्य उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी गंभीर आरोप केले आहेत. विजय कुंभार यांनी याबाबत एक ट्विट केलं असून ज्यात त्यांनी, 24 मजली इमारतीच्या परवान्यासाठी 7 लाखांची लाच मागणारा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा उपायुक्त वैभव विजय साबळे अखेर लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला!
हा तोच वैभव साबळे आहे, ज्याने एमपीएससी परीक्षा “कर्णबधीर” असल्याचं खोटं प्रमाणपत्र लावून पास केली होती. गंमत म्हणजे, 1993 साली ज्या दिवशी जन्म झाला, त्याच दिवशीच त्याला कर्णबधीर असल्याचं सर्टिफिकेट मिळालं! हे सगळं माहित असूनही यंत्रणेकडून काहीतरी कारवाई झाली का? नाही!
पूजा खेडकर प्रकरण उघड झाल्यानंतरच साबळेने शोभेच्या श्रवण यंत्राचा वापर सुरू केला. त्याआधी तो कधीही असे श्रवण यंत्राचा वापर केला नव्हता. लोकांच्या तक्रारींच्या ढिगाऱ्यानंतरही यंत्रणेला जाग आली नाही. का? कारण बहुतेक याच यंत्रणेतील अनेक लोकही हाच फसवेगिरीचा मार्ग वापरूनच सेवेत आले आहेत!
आज ही गोष्ट पुन्हा सिद्ध झालीय की फसवून, खोटं बोलून, प्रमाणपत्र बनवून सेवेत आलेले लोक प्रामाणिक काम करू शकत नाहीत. ते फक्त खुर्चीचा गैरवापर करून, सामान्य जनतेचा छळ करून आणि लाच घेऊन आपल्या बोगस पात्रतेला लपवण्याचं काम करतात. सरळ शब्दांत सांगायचं झालं तर सिस्टम आतून सडलीय. आणि ही सडलेली सिस्टमच आज कर्णबधीर नाही, तर संपूर्णतः मूक आणि अंध झालीय!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.