
Sindhudurg News : गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन आणि भाजप नेते, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील शाब्दीक वाद चांगलाच पेटला आहे. महाजन यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केल्यानंतर थेट नारायण राणे यांनी महाजन यांना धमकीवजा इशारा दिला होता. ज्याला आज (ता.10) महाजन यांनी प्रत्युत्तर देत दंड थोपाटले. तसेच कोठे येऊ असे आव्हान दिलं होतं. यामुळे राज्याचं राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आता कोकणात देखील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. या महाजन-राणे वादात ठाकरे सेनेच्या शिलेदारानं उडी घेतली असून मनसेची पाठ थोपाटली आहे. तर नारायण राणेंनाच आरसा दाखवला आहे.
नारायण राणे यांनी टीका करताना प्रकाश महाजन यांना धमकी दिली. ज्यानंतर महाजनांनी पलटवार करताना त्याच भाषेत टीका केली होती. यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंवर निशाना साधला आहे. नाईक यांनी, तुमची मुलं इतर नेत्यांवर टीका करताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? असा सवाल करताना काँग्रेसचा मुद्दा उपस्थित केला आहे.
वैभव नाईक यांनी, महाजन यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली. त्यांनी तुमच्या मुलांवर टीका केली. जी तुम्हाला झोंबली. जी एका वयस्क नेत्याने केली होती. पण तुमचे चिरंजीव इतर नेत्यांवर टीका करताना तुम्हाला काहीच वाटतं नाही. तुम्ही असो किंवा तुमचे चिरंजीव असोत ते निवडून येण्यासाठी कसे आणि किती पक्ष बदलले याचे आत्मपरीक्षण करा.
याच्याआधी तुम्ही किंवा तुमचे चिरंजीव ज्या पक्षात होते आणि आता ज्या पक्षात आहात, त्या पक्षांवर आणि नेत्यांवर कशी टीका केली आहे. हे देखील पाहावं. तुम्ही ज्या काँग्रेसमध्ये होता. ज्या पक्षात तुमचा मुलगा खासदार होता. तोच आज सोनिया गांधीवर वयाचं भानं न ठेवता टीका करतो.
इतकेच नाही तर ज्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हा सर्वांना घडवलं त्यांच्यावर तुमचे दुसरे सुपुत्र कशी टीका केली. आता उद्धव ठाकरे असोत किंवा राज ठाकरे असोत यांच्यावरही तुमचे सुपुत्र कसे टीका करतात? काँग्रेसमध्ये असताना फडणवीस यांच्यावर कशी टीका झाली. त्यावेळी तुम्ही मुलांना का थांबवलं नाही. आणि आता जर त्यांच्यावर कोणी टीका करतयं म्हणून धमकी देणं बरोबर नाही. तर एका कार्यकर्त्याला तो निवडणूक आला नाही म्हणूनही हिनवणं बरोबर नसल्याचं वैभव नाईक यांनी म्हटलं आहे.
तसेच नारायण राणेंच्या टीकेचा समाचार घेताना, ते निवडणूक आले की नाही या पेक्षा आज ज्या तुम्ही पक्षात आहात तो त्यांनी वाढवला. ते प्रमोद महाजन यांच्यामागे उभे राहिले. हे जरी बाजुली केलं तरी ते प्रमोद महाजन यांचे मोठे बंधू आहेत याचातरी भान ठेवा असे खडे बोलं वैभव नाईक यांनी यावेळी नारायण राणेंना सुनावलं आहे.
निवडून आले पण ते निवडून येण्यासाठी त्यांना किती पक्ष बदलावे लागले याच आत्मपरीक्षण करा. महाजन यांनी तुमच्या मुलावर टीका केलेली तुम्हाला लागली. मात्र हेच तुमचे चिरंजीव इतर पक्षाच्या नेत्यांवर टीका करतात तेव्हा तुम्हाला काहीच कस वाटत नाही असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. प्रकाश महाजन यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर टीका करताना थोडा तरी विचार करा असा सल्ला सुद्धा वैभव नाईक यांनी राणेंना दिला आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.