Vaibhav Naik vs Rane : वैभव नाईकांनी राणेंना पुन्हा डिवचले; म्हणाले, 'मुलाच्या प्रवेशासाठी वर्षा बंगल्याबाहेर उभे राहणाऱ्याला...'

Vaibhav Naik News : माजी आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्यावर विरोधकाकडून केले जात असलेले आरोप फेटाळून लावले आहेत. तर दुसरीकडे मी कायम उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचे सांगत विरोधकांची बोलती बंद केली आहे.
Vaibhav Naik Meets Uddhav Thackeray
Vaibhav Naik Uddhav Thackeray sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. विशेषतः नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीतील तीन पक्षातून महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.

त्यातच कोकणात ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचे चित्र आहे. त्यातूनच एकमेकांवर टीका टिप्पणी केली जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातूनच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्यावर विरोधकाकडून केले जात असलेले आरोप फेटाळून लावले आहेत. तर दुसरीकडे मी कायम उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचे सांगत विरोधकांची बोलती बंद केली आहे.

Vaibhav Naik Meets Uddhav Thackeray
NCP Ajit Pawar: वाचाळवीरांवर अजित पवार नियंत्रण कसे आणणार?

मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना माजी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी त्यांची स्पष्ट भूमिका मांडली आहे. मी कायमच उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे. माझ्याविषयी बोलण्याचा नारायण राणे यांना अधिकार नाही. माझ्याविषयी बोलत असलेले नारायण राणे हेच स्वत:च्या मुलासाठी कितीवेळा वर्षा बंगल्याबाहेर उभे होते, हे सर्वांना माहिती आहे, अशी घणाघाती टीका वैभव नाईक यांनी केली.

Vaibhav Naik Meets Uddhav Thackeray
BJP News : भाजप शहराध्यक्षपदासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये 4 आमदारांची फिल्डिंग; कोण होणार नवा नायक?

अडीच वर्षांत मी एकदाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली नाही. ज्या-ज्या वेळी सत्ताबदल झाला, त्या-त्या वेळी नारायण राणे यांनी त्यांची भूमिका बदलली आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. सोबतच उदय सामंत हे माझे मित्र आहेतच. पण मी सत्तेसाठी हापापलेला नाही, असे रोखठोक विधान त्यांनी करीत राणेंवर टीका केली आहे.

Vaibhav Naik Meets Uddhav Thackeray
Kolhapur BJP Politics: जुन्याच कार्यकर्त्यांना भाजप जिल्हाध्यक्ष पदाची संधी! माधुरी मिसाळांनी नव्यांना ठणकावले

उदय सामंत यांनी दोन दिवसापूर्वी प्रसार माध्यमाशी बोलताना वैभव नाईक हे शिंदे यांच्या शिवसेनेत आल्यास भाजपाचे नेते निलेश राणे त्यांचे स्वागत करतील, असे विधान केले होते. त्यानंतर याच विधानावर भाजपचे नेते नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली होती. उदय सामंत हे आमचे सल्लागार नाहीत, असा टोला त्यांनी लगावला होता.

Vaibhav Naik Meets Uddhav Thackeray
Dharashiv BJP District President : धाराशिव भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच; कोणाची वर्णी लागणार उत्सुकता शिगेला

त्यासोबतच मी परवानगी दिल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना वैभव नाईक हे मला घ्या म्हणत बाहेर असलेले असायचे. वैभव नाईक माझ्याबद्दल काहीही बोलतात. त्यांची माझ्याबद्दल बोलायची लायकी आहे का? असा संताप त्यांनी व्यक्त केला होता. राणे यांनी केलेल्या या विधानानंतर वैभव नाईक यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे आता नाईक यांच्या विधानानंतर यावर नारायण राणे काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Vaibhav Naik Meets Uddhav Thackeray
Shiv Sena UBT: निष्ठावंत शिवसैनिकांना बळ देणार! महिला अन् युवतींवर महत्वाची जबाबदारी सोपवणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com