Councillor Disqualification : अपात्रतेचा महाभडका! 'यांचे 16, त्यांचे 23', 'बविआ' अन् भाजपमध्ये झुंज, कोर्टात रंगणार थेट रणसंग्राम

Vasai-Virar: Court Hearing on BVA & BJP Corporators Disqualification : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीनंतर बहुजन विकास आघाडी आणि भाजपमध्ये नगरसेवकांमध्ये राजकीय लढाई रंगली आहे.
BVA & BJP Corporators
BVA & BJP CorporatorsSarkarnama
Published on
Updated on

Vasai Virar Municipal Corporation : महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये, एकमेकांविरोधात राजकीय डावपेच शिगेला पोहोचले आहेत.

पालघर जिल्ह्यातील वसई-विरार महापालिकेत नगरसेवकांविरोधात अपात्रतेचा महाभडका उडाला असून, तो न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. न्यायालयाने यावर पाच फेब्रुवारीला सुनावणी ठेवली असून, तिथं काय निर्णय होतो, याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे.

वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीनंतर, आता बहुजन विकास आघाडी आणि भाजपमध्ये (BJP) नगरसेवक अपात्रतेची लढाई चांगलीच रंगली आहे. भाजपने बहुजन विकास आघाडीच्या 16 नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे, तर बहुजन विकास आघाडीने भाजपच्या 23 नगरसेवकांविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.

वसई-विरार महापालिका निवडणुकीत (Municipal Election) भाजपच्या 43 नगरसेवकांपैकी 23 नगरसेवकांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये गंभीर कायदेशीर दोष आढळले आहेत, असा आरोप ॲड. प्रवीण पाटील यांनी केला आहे. याबाबत वसई दिवाणी न्यायालयात रिट दाखल करण्यात आले आहे.

BVA & BJP Corporators
Tukaram Mundhe : दिव्यांगांच्या हक्कांशी खेळ? तुकाराम मुंढेंनी दाखवला कायद्याचा चाबूक; वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांनी माहिती लपवून ठेवल्याप्रकरणी त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी करणारी याचिका भाजपचे नितीन ठाकूर यांच्यासह इतर अर्जदारांनी वसईच्या दिवाणी न्यायालयात दाखल केली आहे.

BVA & BJP Corporators
TOP 10 News: सरोदेंच्या ट्विटने शाह-फडणवीसांना राजकीय झटका,सुनेत्रा पवारांचा शपथविधी, खातेवाटप, सरकारी बंगलाही; ना भुजबळ, ना पटेल, ना तटकरे...

बहुजन विकास आघाडीने मित्रपक्षांसोबत 71 जागा जिंकत बहुमत मिळवले आहे. यातील 16 नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना माहिती लपवल्याची माहिती भाजपचे पराभूत उमेदवार नितीन ठाकूर यांनी उजेडात आणली आहे. या माहितीच्या आधारे त्यांनी वसईतील न्यायालयात रिट दाखल केली आहे.

बहुजन विकास आघाडी आणि भाजपच्या या तक्रारींवर आता न्यायालयात पाच फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. न्यायालय काय निर्णय घेत, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ही अपात्रेचा महाभडका इतर राज्यातील महापालिकांमध्ये पोहोचणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com