Vinayak Raut Vs BJP : 'वापरायचं अन् फेकून द्यायचं हीच भाजपाची वृत्ती' ; विनायक राऊतांचे टीकास्त्र!

Vinayak Raut News : 'जे जे भ्रष्टाचारी आहेत त्यांनी भाजपाच्या लॉन्ड्रीमध्ये जायचं अन्..' असंही विनायक राऊतांनी म्हटलं आहे.
Vinayak Raut
Vinayak RautSarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : भाजपचे नेते विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आता राज्यसभेवर पुन्हा भाजपाने उमेदवारी न देता काँग्रेस मधून भाजपामध्ये आलेले अशोकराव चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. आता या सगळ्या विषयावरून ठाकरे गटाचे कोकणातील खासदार विनायक राऊत यांनी निशाणा साधला आहे.

'वापर करायचा अन् सोडून द्यायचे, हे नारायण राणेंना भाजपाने दाखवून दिले आहे. कोकणात काय आणि महाराष्ट्रात काय शिंदे गटाला वाटण्याच्या अक्षता लावण्याचे काम भाजपकडून करण्यात येत आहे.' असं विनायक राऊत यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vinayak Raut
MLA Vaibhav Naik News : ठाकरेंचे निष्ठावान आमदार नाईक अन् भाजप मंत्र्यांची गुप्त भेट; चर्चांना एकच उधाण!

'अशोकराव चव्हाणांसारख्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्याला भाजपामध्ये घ्यायचं आणि त्यांना राज्यसभेची उमेदवारी द्यायची. पण त्यापेक्षा मेहनत घेतलेल्या आयुष्यभर भाजपामध्ये खर्ची घातलेल्या अशा प्रामाणिक भाजपाच्या कार्यकर्त्याला जर का राज्यसभेचे खासदारकी दिली गेली असती, तर ते अधिक शोभादायक ठरल असतं.' असा टोला विनायक राऊत यांनी लगावला आहे.

याशिवाय 'जे जे भ्रष्टाचारी आहेत त्यांनी भाजपाच्या लॉन्ड्रीमध्ये जायचं, त्यांच्या मशीनमध्ये जायचं आणि स्वच्छ होऊन बाहेर यायचं हा सध्याचा फॉर्म्युला आणि त्यांच्या राजकीय धंदा आहे.' अशी टीका राऊत यांनी केली आहे. कोकणात महायुतीमध्ये गोची नव्हे तर त्यांचा ढेकूण पण राहिलेला नाही.' अशी टीका राऊतांनी केली.

Vinayak Raut
Nilesh Rane : भास्कर जाधवांच्या मतदारसंघात उद्या नीलेश राणेंची तोफ धडाडणार; चिपळूण, गुहागरवर पोलिसांचा वॉच

'सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील उपोषण करत आहेत. त्या जरांगे पाटील यांच्या जीवाशी खेळण्याच क्रूर कृत्य हे महाराष्ट्राचं एकनाथ शिंदे सरकार करत आहे.' असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. मागच्या वेळेला त्यांना फसवलं आणि स्वतःच टेंभा मिरवण्याचा प्रयत्न केला. शिंदे सरकार जरांगे पाटलांच्या मागण्यांना नेहमीच भूलथापा देत राहिला आहे. सरकार मराठा समाजाशी बेईमानी करत आहे.' असा आरोपही त्यांनी केला आहे.

निलेश राणे यांची गुहागर येथे भास्कर जाधव यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सभा होणार आहे. या विषयावर बोलताना राऊत यांनी सांगितले की असल्या घड्याळ प्रवृत्तीच्या माणसाला लोकं फार प्रतिसाद देत नाहीत. असाही टोला खासदार विनायक राऊत यांनी लगावला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com