
Sindhudurg News : वक्फ दुरुस्ती विधेयक (Waqf Amendment Bill 2025) मंगळवारी (ता.2) रात्री लोकसभेत मंजूर झाले. आज (ता.3) ते राज्यसभेत मांडले जाणार आहे. त्यामुळे येथे कोणता निर्णय होतो याकडे देशासह मुस्लिम समाजाचे लक्ष लागले आहे. यादरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. तसेच भाजपचा डोळा वक्फच्या जमिनीवर असल्याचा दावा केला. यावरून आता राज्यात राजकीय वाद सुरू झाला असून सत्ताधाऱ्यांनी ठाकरे आणि ठाकरे गटावर हल्ला चढवला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी देखील ठाकरेंसह ठाकरे गटावर निशाना साधत टीका केली आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर आज टीका केली. त्यांनी, भाजपवाल्यांनी आम्हाला हिंदुत्त्व शिकवण्याची गरज नाही. काल जी भाषणं झाली ती ऐकताना गद्दारांनी आपली लाज सोडली होती का? असा सवाल शिंदे शिवसेनेला केला होता. तर अमेरिकेने वाढवलेल्या कराच्या मुद्द्याला बगल देण्यासाठीच केंद्र सरकारने राज्यांना विश्वासात न घेताच वक्फ दुरुस्ती विधेयक आणल्याचा आरोप केला होता. तर मोदींनी विश्वासात घेऊन जर हे विधेयक आणलं असतं तर एकमुखाने पाठिंबा दिला असता, असंही ठाकरे यांनी म्हटलं होतं.
यावरून आता निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. त्यांनी, केंद्र सरकारने लोकसभेच वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली आहे. हे विधेयक लोकसभेत पास झालं म्हणून उबाठा दुःखात गेली आहे. तर या विधेयकामुळे वक्फ बोर्डात सुधारणा होणार असून कायदेशीर बाबी यात येणार आहेत. याच गोष्टी उबाठाला पचलेल्या दिसत नाहीत. यामुळेच त्यांची अवस्थाही आता बाप मेल्यासारखी झाल्याची जहरी टीका केलीय.
उबाठा गट तुम्ही एका समाजाचे, एका धर्माचे असून दुसऱ्या धर्माचं लांगुनचालन करत आहात, करा. पण हा देश कायदा आणि संविधानावर चालतो. येथे प्रत्येकासाठी कायदा समान असून मुसलमानांना वेगळा कायदा असणार नाही. त्यांच्या जमिनी म्हणजे काय? कायद्याचे अंतर्गत ज्या जमिनी त्यांच्या आहेत त्या त्यांनी खुशाल घ्याव्यात. पण बाहेर इकडे जमीन लुटायचा अधिकार कोणी दिलाय. तो कोणालाच नाही. उबाठाला कितीही वाईट वाटलं तरी वक्फ बोर्डाच्या जमिनी ह्या कायद्यानेच आता चालणार असे ठणकावून निलेश राणे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान निलेश राणे यांनी ओवैसी बंधूंवरदेखील टीका केली आहे. यावेळी निलेश राणे पुढे म्हणाले, ओवैसी बंधू देशाचे कायदे मानत नसून ओवैसींनी विधेयक फाडले. विधेयक फाडणे म्हणजे ते कॉन्स्टिट्यूशन डॉक्युमेंट फाडण्यासारखंच आहे. एकीकडे कॉन्स्टिट्यूशनच्या बाता मारयच्या आणि दुसरीकडे विधेयक फाडायचे हा बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा अपमान असल्याची टीका निलेश राणे यांनी ओवैसींवर केली आहे.
तसेच एका समाजातील काही लोकांना वाटतं की आम्ही करू तोच कायदा. ओवैसींच्या दोन्ही भावंडांनाही तेच वाटतं. त्यांना हा देश आपला नाही असं वाटतं, त्यामुळे त्यांना आपण पाकिस्तानचे असल्याचेही वाटतं. त्यामुळेही आम्ही त्यांना पाकिस्तानचे म्हणूनच मरणार. या दोघांना भारताबद्दल आस्था नसून ते कधी भारत माता की जय, वंदे मातरम, जनगणमन म्हणत नाहीत असाही दावा निलेश राणे यांनी केला आहे. तर ओवैसी बंधू अवलादी पाकिस्तानच्या अवलादी असून येथे राहून हे भारतावर बोलतात याचेच दुःख असल्याचेही निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.