Mumbai : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील भेटीगाठी पाहून महाविकास आघाडीतील पक्ष सावध झाले आहेत. त्यातूनच शिवसेना आणि काँग्रेसने निवडणुकीबाबत स्वतंत्र रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लोकसभेच्या ४८ मतदारसंघाचा उद्यापासून (ता. १६ ऑगस्ट) आढावा घेणार आहेत. ठाकरे हे १९ ऑगस्टपर्यंत विभागनिहाय बैठका घेणार आहेत. (Uddhav Thackeray will review 48 Lok Sabha constituencies from tomorrow)
लोकसभेच्या आगामी निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षाकडून सुरू झाली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून सर्वच ४८ मतदारसंघाचा आढावा घेण्यात येत आहे. त्यातच अजित पवार आणि शरद पवार गटातील वाढत्या गाठीभेटी पाहून उद्धव ठाकरे गटही सावध झाला आहे. त्यांच्याकडून राज्यातील सर्वच सर्व ४८ मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.
या आढावा बैठकीसाठी उद्धव ठाकरे गटाचे उपनेते, खासदार, आमदार, माजी खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख व प्रमुख पदधिकारी उपस्थित राहणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील रणनीतीसाठी मार्गदर्शन करणार आहेत. लोकसभेच्या ४८ मतदारसंघाचा १६ ते १९ ऑगस्ट यादरम्यान सलग चार दिवस आढावा घेतला जाणार आहे. ही बैठक सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे.
या बैठकीत मुंबई व कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, खान्देश व मराठवाड्यातील मतदारसंघनिहाय आढावा घेतला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीची रणनीती या बैठकीत ठरली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सर्व पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
लोकसभानिहाय होणार मतदार संघाची बैठक
ता. १६ ऑगस्ट- नंदुरबार, धुळे, जळगाव रावेर
ता. १७ ऑगस्ट- नगर,नाशिक, दिंडोरी
ता.१८ ऑगस्ट- मावळ, शिरूर, बारामती, पुणे
ता. १९ ऑगस्ट-सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.