Bharat Gogawale News:..तर माझी बायको आत्महत्या करेल ; मंत्रिपदाला उशीर का ? गोगावलेंनी सांगितले धमाल किस्से

Maharashtra Politics : , दुसऱ्याने सांगितले नारायण राणे मला जगू देणार नाहीत. तिसरा म्हणाला मला मंत्रिपद मिळाले नाही तर मी राजीनामा देतो.
Bharat Gogawale News :
Bharat Gogawale News :Sarkarnama
Published on
Updated on

Alibaug : शिंदे गटातील आमदार भरत गोगावले मंत्रिपदासाठी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली ती गोगावलेंचे नाव चर्चेत येते. त्यांना रायगडचे पालकमंत्री व्हायचयं. "आम्ही तयारीमध्ये बसलो आहोत. कधीही कॉल येईल तसं आम्ही निघू," असे म्हणणाऱ्या गोगावलेंनी त्यांच्या मंत्रिपदाला उशिर का झाला, याचा रंचक किस्सा सांगितला अन् उपस्थितांमध्ये हशा पिकला.

अलिबागमधील एका पक्षप्रवेश कार्यक्रमात गोगावले बोलत होते. त्यांनी मंत्रि‍पदासाठी इच्छुकांचे किस्से सांगितले. आपण मंत्रिपदासाठी का थांबलो, याचेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.

Bharat Gogawale News :
Sharad Pawar Rally In Beed : कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या.. ; शरद पवारांची तोफ धडाडण्यापूर्वीच मुंडे समर्थकांकडून बॅनरबाजी

"मंत्रिमंडळ विस्तारात माझाच नंबर होता, परंतु मी थांबलो. एकाने सांगितले की मला मंत्रिपद मिळाले नाही तर माझी बायको आत्महत्या करेल, दुसऱ्याने सांगितले नारायण राणे मला जगू देणार नाहीत. तिसरा म्हणाला मला मंत्रिपद मिळाले नाही तर मी राजीनामा देतो. मी एकाला फोन केला, त्याला सांगितले अरे, तुमच्या संभाजीनगरमध्ये पाचपैकी दोघांना संधी दिली. तुला काय घाई आहे, असे सांगून त्याला थांबवले. आम्ही थांबलो ते अजूनपर्यंत थांबलो आहे,"

पंचायत समिती निवडणुकीत एखाद्या इच्छुकाला थांबायला सांगितले की तो पक्षसोडून जाण्याचा इशारा देतो, असे गोगावले म्हणाले. १४ जुलै २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यावेळी कुणाला कोणतं खातं मिळणार यावरुन मोठी चढाओढ सुरू होती.

Bharat Gogawale News :
Shivraj Bangar Resigns: शिवराज बांगरांची सहा महिन्यातच बीआरएसला सोडचिठ्ठी; BRS ही भाजपची बी टीम..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आलेले शिवसेनेतील अनेक आमदार अद्यापही मंत्रिपदाची वाट पाहात आहेत. बंड केलेलेल्या आमदारांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर असल्याचं देखील म्हटलं जात आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते देण्यात आले आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com