Bhaskar Jadhav News : भास्करराव बोलताना भावूक झाले अन्‌ विधानसभा ‘पिन ड्रॉप सायलेंट’ झाली...

Winter Session 2023 : पाच वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांच्या लक्षवेधी लागतात आणि सभागृह चालू असताना घडलेल्या घटनांच्या लक्षवेधी लागत नाहीत. हा माझ्यावरील अन्याय आहे.
Rahul Narwekar_Bhaskar Jadhav
Rahul Narwekar_Bhaskar JadhavSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : मागील अधिवेशनाप्रमाणे याही अधिवेशनात माझी लक्षवेधी लागली नाही. माझा हक्क सातत्याने डावलला जातो आहे. माझ्याबरोबरच तुम्ही माझ्या मतदारसंघातील जनतेवर अन्याय करत आहात, ते भविष्यात आपल्याकडून पुन्हा होऊ नये. मी तुमचा आणि त्या खुर्चीचा अवमान करू इच्छित नाही. पण, माझ्याही आत्म्याला पीळ पडतो, कारण माझ्यासारख्या ज्येष्ठ माणसाला अशी वागणूक मिळते, अशा शब्दांत शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी भावूक होत आपली व्यथा मांडली. जाधव बोलत असताना सभागृहात ‘पिन ड्रॉप’ शांतता पसरली होती. कारण सर्वजण आवक्‌ झाले होते. (Bhaskar Jadhav expressed his displeasure for not getting lakshvedhi in assembly session)

आमदार जाधव म्हणाले की, मला आपल्या उपस्थितीत आपलं अभिनंदन करायचं होतं. आपण चेअर सोडून गेला, पुन्हा आलात, त्याबद्दल आपला आभारी आहे. अभिनंदन एवढ्यासाठी करायचं होतं की मागच्या अधिवेशनात आपल्यावर थोडीशी नाराजी व्यक्त करताना मी असं म्हणालो होतो की, आपण माझी एकही लक्षवेधी लावली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rahul Narwekar_Bhaskar Jadhav
Winter Session 2023 : महाराष्ट्राचे 8 हजार कोटींचे नुकसान; पृथ्वीराजबाबांनी दाखवलेल्या 'जीआर'मध्ये काय आहे?

मी बोलल्यानंतर आपण सभागृहातील वेगवेगळ्या आयुधांच्या माध्यमातून मी सभागृहात कोणकोणत्या विषयात भाग घेतला. किती वेळ बोललो, हे तुम्ही दाखवलं. पण त्यावेळी मी सभागृहात नव्हतो. ते सर्व भाष्य मी माझ्याकडे घेऊन ठेवले आहे. पण, त्या सगळ्या भाष्यामध्ये भास्कर जाधव यांनी केलेला आरोप खोटा होता; म्हणून माझीही एखादी लक्षवेधी लागली, असे आपण सांगितले नाही. पण, मला सभागृहात बोलायला दिले, हे खरं आहे, असेही जाधव यांनी मान्य केले.

जाधव म्हणाले की, आज मी आपलं अभिनंदन एवढ्यासाठी करतो, अध्यक्ष महोदय. याही अधिवेशनात पहिल्या दिवशी सात तारखेला माझी लक्षवेधी होती. पण ती लक्षवेधी काही कारणास्तव पुढे गेली. एखादी लक्षवेधी पुढे गेल्यानंतर पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी लागते. अधिवेशनाचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या सभागृहात मी कदाचित नसेन; कारण मला जावे लागेल. आजसुद्धा २२ लक्षवेधी ह्या रेग्युलर सिटिंगमध्ये आहेत. दहा लक्षवेधी स्पेशल सिटिंगमध्ये आहेत. याही वेळी पुढे ढकलेली माझी लक्षवेधी लागलेली नाही. हे सातत्याने माझ्याबाबत घडतंय.

अभिनंदन हा शब्द मी सोडून देतो. कारण खुर्चीवर कोण बसलंय, हे महत्वाचं नाही तर त्या खुर्चीचं महत्व आहे. त्यामुळे अभिनंदन नाही. पण, माझी लक्षवेधी याही अधिवेशनात लागली नाही, ही बाब मी पुन्हा आपल्या लक्षात आणून देतो. माझा हक्क सातत्याने डावलला जातो आहे. पाच वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांच्या लक्षवेधी लागतात आणि सभागृह चालू असताना घडलेल्या घटनांच्या लक्षवेधी लागत नाहीत. हा माझ्यावरील अन्याय आहे, तो तुम्ही माझ्या मतदारसंघातील जनतेवर करत आहात, ते आपल्याकडून भविष्यात होऊ नये, हे लक्षात आणून द्यावं, म्हणून आपल्या उपस्थितीत मला तुमचं अभिनंदन करायचं होत. पण, अभिनंदन करून तुमचा आणि त्या खुर्चीचा मी अवमान करू इच्छित नाही. माझ्याही आत्म्याला पीळ पडतो, कारण माझ्यासारख्या ज्येष्ठ माणसाला अशी वागणूक दिली जाते. हे होऊ नये एवढीच माझी विनंती आहे, अशी व्यथा भास्कर जाधव यांनी मांडली.

Rahul Narwekar_Bhaskar Jadhav
Narsayya Adam Dream Project : मोदींची सभा यशस्वी करण्यासाठी माकपचे आडम मास्तर लागले कामाला; माजी आमदारांची स्वप्नपूर्ती

भास्कर जाधव यांनी लक्षवेधी संदर्भात मांडलेल्या मुद्दाला विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी उत्तर दिले. नार्वेकर म्हणाले की, भास्कर जाधव यांची लक्षवेधी पुढे का ढकलेली हे मी स्वतः बघेन. सदस्य उपस्थित नसतात, त्या वेळी ती लक्षवेधी रद्द केली जाते. किंवा सदस्यांच्या विनंतीवरून पुढे ढकलतो. आपल्या केसमध्ये का पुढे ढकलली, याची चौकशी करण्यात येईल. मंत्री उपस्थित नसल्यामुळे ती पुढे ढकलली असेल तर उद्याच्या कार्यक्रमात मी ती दाखवेन.

ॲड नार्वेकर म्हणाले की, भास्कर जाधव आणि सर्व सदस्यांना सांगतो की मी किंवा कोणताही अध्यक्ष एखाद्या सदस्याला टार्गेट करून हेतपुरस्पर बोलायची संधी न देण्याचे काम करत नाही. त्यामुळे भास्कर जाधव यांनी आपला गैरसमज काढून टाकावा. सभागृह चालवण्यासाठी तुमचा विश्वास पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर दाखवावा, अशी मी आपल्याला विनंती करतो.

Rahul Narwekar_Bhaskar Jadhav
Maharashtra Politics : राणेंनी झळकावलेल्या फोटोला महाविकास आघाडीचे विधान परिषदेतून उत्तर...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com