भास्कर जाधवांचे रामदास कदमांवर गंभीर आरोप? तरिही योगेश कदम म्हणतात, 'त्यांच्यावर माझा विश्वास...' नेमकं काय घडतयं तळ कोकणात?

Yogesh kadam On Bhaskar jadhav : भास्कर जाधव यांनी दादरच्या मेळाव्यात गंभीर आरोप केला होता. त्यावेळी त्यांनी शिवसेनेतील जेष्ठ नेते रामदास कदम यांचे नाव घेतले होते. त्यावरून आता तळ कोकणातील राजकीय वातावरण तापले आहे.
Bhaskar Jadhav On Ramdas Kadam And yogesh Kadam
Bhaskar Jadhav On Ramdas Kadam And yogesh Kadamsarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. योगेश कदम यांनी भास्कर जाधवांच्या तुरुंगात टाकण्याच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

  2. त्यांनी सांगितले की, त्यांनी कधीही वैयक्तिक टीका केलेली नाही किंवा डिवचलेले नाही.

  3. त्यांच्या मते, भास्कर जाधवांच्या मतदारसंघातील काही गावे आधी रामदास कदमांच्या मतदारसंघात होती.

Ratnagiri News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी कोकणातील चाकरमान्यांचा मेळाव्यात गंभीर आरोप केले. त्यांनी गुहागर मतदारसंघातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला. जेष्ठ नेते रामदास कदम यांच्यावर आरोप करताना, कदम यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी आपल्याला अटक करण्यासाठी दबाव आणला. त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधीक्षकांना फोन केल्याचा गौप्यस्फोट भास्कर जाधव यांनी केला होता. यानवरून कोकणासह राज्यात एकच खळबळ उडाली होती. यावरून आता मंत्री योगेश कदम (Yogesh kadam) यांनी त्या आरोपाला आणि टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. (Yogesh Kadam replies to Bhaskar Jadhav’s allegations, advises avoiding politics in every matter, and explains constituency history with Ramdas Kadam)

योगेश कदम यांनी भास्कर जाधव यांनी मेळाव्यात केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना, भास्कर जाधव यांनी प्रत्येक गोष्टीत राजकारण करू नये, असा सल्ला दिला आहे. तसेच भास्कर जाधव यांनी केलेल्या तुरुंगात टाकण्याचा आरोपावर योगेश कदम यांनी, त्यांचा मतदारसंघ आणि माझा मतदार संघ लागून आहे. मी कधीही त्यांच्यावर वैयक्तिक टीका केलेली नाही किंवा त्यांना डिवचलेलं नाही. पण त्यांच्या मतदारसंघातील काही गावे आधी आमच्या वडिलांच्या म्हणजेच रामदास कदमांच्या मतदारसंघात होती.

Bhaskar Jadhav On Ramdas Kadam And yogesh Kadam
Yogesh Kadam: कदम कुटुंबाला 'तोडपाणी गँग' म्हणत अनिल परबांचा इशारा; म्हणाले, टप्प्याटप्प्यानं बाहेर...

त्यांचा अजूनही आमच्यावर विश्वास आहे. माझे वडील 20 वर्षे तिथे आमदार होते. पण, मी कधीच वैयक्तिक टीका केलेली नाही. त्यामुळे, प्रत्येक गोष्टीत जाधव यांनी राजकारण आणू नये. तर ज्या वेळचा किस्सा जाधव सांगत आहेत. तो मला आजही आठवत असून काही लोकांचे असे म्हणणे आहे की तो हल्ला त्यांनी स्वत: घडवून आणला.

दरम्यान भास्कर जाधव यांनी गुहागरमधील ब्राह्मण समाजाबाबत केलेल्या वक्तव्यावर योगेश कदम यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, यावर मी बोलणार नाही, असेही योगेश कदम यांनी म्हटले होते.

रेकॉर्डब्रेक पोलीस भरती

मागील पाच वर्षात देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून 17 हजार, 18 हजार आणि आता 15 हजार पोलिसांची भरती केली जात आहे. गेल्या पाच वर्षात रेकॉर्डब्रेक भरती आम्ही करत असून कायदा सुव्यवस्था प्रश्न हाताळताना पोलिसांवर ताण येत होता, पण आता हे होणार नाही. त्यामुळेच, आजचा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतला आहे. आता लवकरच पुढील प्रक्रिया सुरू होईल, असेही कदम यांनी म्हटलं आहे.

Bhaskar Jadhav On Ramdas Kadam And yogesh Kadam
'पुण्यात कोयता गॅंग अ‍ॅक्टिव्ह नाही' Yogesh Kadam नक्की काय म्हणाले ? ।Pune Crime News।

FAQs :

प्र.१: योगेश कदमांनी भास्कर जाधवांविषयी काय म्हटले?
उ: त्यांनी सांगितले की, प्रत्येक गोष्टीत राजकारण करणे योग्य नाही आणि त्यांनी कधीही वैयक्तिक टीका केलेली नाही.

प्र.२: तुरुंगात टाकण्याच्या आरोपाबाबत योगेश कदमांनी काय प्रतिक्रिया दिली?
उ: त्यांनी हा आरोप फेटाळून लावला आणि तो निराधार असल्याचे सांगितले.

प्र.३: रामदास कदमांचा मतदारसंघ या वादात कसा जोडला गेला?
उ: भास्कर जाधवांच्या मतदारसंघातील काही गावे आधी रामदास कदमांच्या मतदारसंघाचा भाग होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com