BJP Candidate : अर्ज दाखल केला की घातला? भाजप उमेदवाराचा गोंधळ सोशल मीडियावर व्हायरल अन्...

Sawantwadi Election : सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीची सद्या धामधूम सुरू असून अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान उमेदवारी भरण्यासाठी गेलेल्या भाजपच्या उमेदवाराला मराठी बोलता येत नसल्याचे समोर आले आहे.
Sawantwadi Election; BJP Mayor post Candidate trolled
Sawantwadi Election; BJP Mayor post Candidate trolledsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवाराचा मराठी बोलताना अडखळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

  2. अर्ज दाखल करताना ‘अर्ज भरला की घातला?’ असा गोंधळ झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असून यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

  3. सावंतवाडीतील निवडणूक वातावरणात या व्हिडिओमुळे अचानक चर्चेचा नवा मुद्दा समोर आला आहे.

Sawantwadi News : सावंतवाडी नगरपालिका निवडणूक 2 डिसेंबरला होत असून दुसऱ्याच दिवशी (ता.3) मतमोजणी आणि निकाला लागणार आहे. यामुळे पर्यटन तसेच शांतता आणि सुंदरतेसाठी प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक सावंतवाडी शहरात आतापासूच तापमान गरम होताना दिसत आहे. अशातच येथे भाजपकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित करण्यात आल्याने महायुतीत पेच निर्माण झाला होता. तसेच आता हाच उमेदवार मराठी बोलण्यावरून प्रचंड ट्रोल होताना दिसत असून व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. यामुळे या युवराज्ञी कोण? असा सवाल आता सोशल मिडीयावर विचारला जात आहे.

सिंधुदुर्गातील तीन पालिका आणि एक नगरपंचायत निवडणुकीसाठी नगरसेवकसाठी 224, तर नगराध्यक्ष पदासाठी 17 असे एकूण 241 उमेदवारी अर्ज रविवारी (ता.16)पर्यंत दाखल झाले आहेत. यामुळे येथे पालिका निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होण्याची शक्‍यता मावळली असून दोन्ही पक्षांनी स्वबळाची तयारी केली आहे.

सावंतवाडी नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने भाजपसह शहर विकास आघाडी आणि अपक्षांनी देखील जोरदार तयारी केली आहे. 20 नगरसेवक असणाऱ्या नगरपालिकेसाठी आजपर्यंत 56 अर्ज दाखल झाले असून नगराध्यक्ष पदसाठी 7 जणांनी नशिब आगमावण्याचे ठरवले आहे. त्यासाठी अर्जही दाखल केले आहेत.

Sawantwadi Election; BJP Mayor post Candidate trolled
kokan Politics : तळकोकणात भाजपविरोधात शिंदेंच्या शिवसेनेची खेळी? विरोधकांबरोबर युतीची शक्यता

यावेळी सावंतवाडी नगरपालिकेचा नवा नगराध्यक्ष कोण असणार, ती महिला कारभारीण कोण ठरणार याची उत्सुकता अनेकांना लागली असतानाच युवराज्ञी सावंत-श्रद्धाराजे भोसले मात्र आता चांगल्याच व्हायरल होताना दिसत आहेत. त्या त्यांच्या मराठी बोलण्यामुळे आता प्रचंड व्हायरल होत असून त्यांना नीट अर्ज भरला की घातला? हे देखील बोलता येत नसल्याचे समोर येत आहे.

सावंतवाडीला ‘सुंदरवाडी’ करायचीय!

यावेळी युवराज्ञी सावंत-भोसले म्हणाल्या, ‘श्री देव पाटेकर आणि उपरलकर देवाचा आशीर्वाद घेऊन नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नीतेश‌ राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आम्हाला सावंतवाडी विकसित करायची आहे. सावंतवाडीला ‘सुंदरवाडी’ करायची आहे. जनतेनं संधी दिली तर ते करून दाखवू. नगराध्यक्ष पदाची संधी मिळाल्यास महिलांसाठी सुरक्षा, कचरा व्यवस्थापन आणि रोजगार निर्मितीवर माझा विशेष भर राहणार आहे.’

पण हे बोलत असनाता त्या अनेकदा अडखळल्या, त्यांना सन्मानियही बोलता येत नव्हते. तसेच त्यांनी आपण भाजपमधून अर्ज दाखल केला असे न बोलता घातला आहे, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या वक्तव्यानंतरच आता त्या चांगल्याच ट्रोल होत असून त्यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Sawantwadi Election; BJP Mayor post Candidate trolled
Kokan Politics : शिवसेनेनं ऐनवेळी नकार दिलाच तर राष्ट्रवादीचा बॅकअप प्लॅन; तटकरे योगेश कदमांना दाखवणार 'राजकीय कॅल्क्युलेशन'?

FAQs :

1) युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले का व्हायरल झाल्या?
मराठी भाषेत बोलताना अडखळल्याचा आणि चुकीचे शब्द वापरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.

2) त्या कोणत्या पक्षाच्या उमेदवार आहेत?
त्या भाजपकडून सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत.

3) व्हिडिओ कुठे शूट झाला?
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी.

4) लोकांनी व्हिडिओवर कशा प्रतिक्रिया दिल्या?
सोशल मीडियावर हशा, टीका, आणि मीम्सची बरसात दिसत आहे.

5) या व्हिडिओचा निवडणुकीवर काय प्रभाव पडू शकतो?
स्थानिक वातावरणात चर्चा अधिक तीव्र झाली असून उमेदवाराच्या प्रतिमेवरही परिणाम होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com