Sanjay Raut News : मावळातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथे पूल कोसळून चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर हा पूल धोकादायक असल्याचे तसेच त्याच्याकामासाठी आठ कोटी मंजूर केले होते, असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. मात्र, शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारने कागदावर पैसे मंजूर केले पण काम का केले नाही? सवाल करत आठ कोटी नव्हे तर 80 हजाराची रक्कम असणाऱ्या कागदावर मंत्र्याने सही केल्याचे सांगितले.
संजय राऊत यांनी मावळचे भाजपचे अध्यक्ष रवींद्र भेगडे यांना तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुलाच्या काम मंजुर केल्याचे पत्र पाठवले होते ते माध्यमांना दाखवले. त्या पत्रात पुलाच्या कामासाठी 80 हजाराची तरदूत असल्याचे दिसते त्यावर मंत्री चव्हाण यांची स्वाक्षरी देखील आहे.
'एकतर मंत्र्याने झोपेत सही केली किंवा जनतेला मुर्ख बनवले जात आहे. फडणवीसांचे राज्य आहे,चालायचेच!', असा टोलाही राऊत यांनी लगावला. तसेच ते म्हणाले, 'काम आहे आठ कोटीचे आणि पत्रावर सही आहे 80 हजाराच्या कागदावर. म्हणजे आपण कोणत्या कागदावर सही करतोय हे मंत्री पाहत नाही. ज्या कामासाठी 10 ते 15 कोटीची आवश्यकता आहे तेथे 80 हजाराच्या पत्रावर सही करताये हे मंत्री.'
सरकार पूलाच्या कामाबाबत किती गंभीर आहे? सांगत आहेत की कागदावर पैसे मंजूर झाले आहेत. सरकारने पुलाच्या कामासाठी पैसे मंजूर केले कागदावर मग पूल का नाही झाला? मंजूर झालेले पैसे गेले कुठे? लोकांचा बळी गेला. त्याला हे सरकार जबाबदार आहे, असे देखील राऊत म्हणाले.
कुंडमळा दुर्घटनेतील खरा आकडा समोर आला नाही. पालकमंत्री म्हणून अजित पवार या घटनेची जबाबदारी घेणार आहात की झटकून टाकणार आहात. अजित पवारांना सगळंच माहिती असतं काल ते एका पत्रकाराला दम देत होते. जर त्यांना सगळचं माहिती असतं तर हा पूल जुना झालाय हे त्यांना माहीत नव्हतं का? असा सवाल देखील राऊत यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.