

Ladki Bahin Yojana News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील तब्बल 65 ते 70 लाख महिलांचा बंद झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक महिलांना हा लाभ का बंद झाला याची कारण अद्याप समजलेले नाही. त्यामुळे आता महिलांना थेट जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयातून लाभ बंद होण्याचे नेमके कारण सांगितले जाणार आहे.
केवायसी (KYC) दुरुस्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अनेक महिलांचा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीनंतर लाभ बंद झाला; परंतु त्याचे कारण त्यांना समजलेले नाही, त्यांनी थेट जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयातून कारण समजून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तुम्हालाही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नसेल, अथवा बंद झाला असेल.. तर तुमच्या जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात लाभ बंद का झाला? याचं कारण समजणार आहे.
राज्यातील लाडक्या बहिणींना महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी खास मेसेज केला आहे. महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे. त्याशिवाय नव्याने लाडकी बहीण योजनेची नोंदणी सुरू नसल्याचेही त्यांनी सांगितले.
लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे. मात्र, ईकेवायसी (EKYC) करताना काही त्रुटी राहिल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या प्रक्रियेसाठी कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नाही. महिला मोबाईलवरून स्वतः ईकेवायसी (EKYC) करू शकतात किंवा जवळील अंगणवाडी सेविकांची मदत घेऊ शकतात, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.