

राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेला महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. मात्र, या योजनेत काही बोगस लाभार्थी आढळल्याने शासनाने ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य केली आहे. पण दोन महिने उलटूनही बहुतांश महिलांचं ई-केवायसी पूर्ण झालेलं नाही.
महिला व बालविकास विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील एकूण 2 कोटी 40 लाख लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत फक्त 80 लाख महिलांनीच ई-केवायसी पूर्ण केली आहे. तांत्रिक अडचणी, ओटीपी न येणे, आधार लिंकसंबंधी समस्या अशा कारणांमुळे अनेक महिलांना ई-केवायसी करताना अडचणी येत आहेत.
विभागाने 18 सप्टेंबरपासून ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली असून 18 नोव्हेंबरपर्यंत सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. मात्र, अजूनही बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रक्रिया केली नसल्याने मुदतवाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की, 'ई-केवायसी प्रक्रिया जलद गतीने सुरू आहे. पुढील आठवड्याभरात बहुतेक लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल."
दरम्यान, या योजनेत बोगस लाभार्थ्यांचा मोठा प्रश्न समोर आला आहे. 26 लाख लाभार्थ्यांचे पैसे तात्पुरते थांबविण्यात आले होते. यापैकी 20 लाख महिलांची पडताळणी पूर्ण झाली असून त्यांना लवकरच लाभ मिळणार आहे. मात्र सहा लाख लाभार्थ्यांची ओळख अद्यापही निश्चित झालेली नाही. संबंधित महिलांशी फोनद्वारे संपर्क साधून तसेच त्यांच्या पत्त्यावर जाऊन पडताळणी सुरू आहे.
शासनाने योजनेचा उद्देश प्रामाणिकपणे पात्र महिलांपर्यंत पोहोचावा म्हणून काटेकोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. पण अद्याप लाखो महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण असल्याने प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं आहे. येत्या काही दिवसांत निर्णय होणार असल्याने लाभार्थ्यांच्या नजरा शासनाकडे लागल्या आहेत
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.