Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण होणार नावडती! 'या' महिलांना मिळणार नाहीत पैसे?

Ladki Bahin Yojana Aditi Tatkare : अर्ज छाननीमध्ये 15 ते 20 टक्के अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका तब्बल 40 लाख लाभार्थी महिलांना बसण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSarkarnama
Published on
Updated on

Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी 'लाडकी बहीण योजना' गेमचेंजर ठरली. या योजनेमुळे महायुतीला मोठे यश मिळाल्याचा दावा महायुतीमधील नेतेच करत आहेत. मात्र, निवडणुकीनंतर ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत होता. त्यातील काही महिलांना वगळण्यात येतील, असे संकेत आमदार आदिती तटकरे यांनी दिले आहे.

एका वृत्तपत्राशी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या, अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न तसेच घरात चारचाकी वाहन असलेल्या महिलाही योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी असून त्यामुळे आता अर्जांची छाननी केली जाणार आहे. छाननीनंतर नियमबाह्यपणे अर्ज बाद केले जातील.

अर्ज छाननीमध्ये 15 ते 20 टक्के अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका तब्बल 40 लाख लाभार्थी महिलांना बसण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana
Rahul Narwekar: दुसऱ्यांदा विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राहुल नार्वेकरांचा मोठा निर्णय, विरोधीपक्षांनाही 'दे धक्का'

महायुतीने विधानसभा निवडणुकीत विजयानंतर लाडक्या बहिणींचा हफ्ता 1500 रुपयांवरून 2100 करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हे पैसे मार्चनंतर मिळण्यास सुरुवात होईल अशी शक्यता आहे. तर, भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी 2100 रुपये पुढील वर्षी दिवाळीनंतर मिळतील असे म्हटले होते.

जर वाढीव रक्कम दिली नाही तर देशात चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की आपल्या शब्दावर ठाम राहावे. ही वाढीव रक्कम कोणत्या महिन्यात द्यायची यावर चर्चा केली जाईल. पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Ladki Bahin Yojana
Raosaheb Danve News : रावसाहेब दानवे म्हणतात, महायुतीत 'ऑल इज वेल'!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com