Laxman Hake Driver Controversy : फॉर्च्युनर गाडी अन् ड्रायव्हरमुळे अडचणीत असताना लक्ष्मण हाकेंचा मोठा खुलासा, म्हणाले, 'पैसा थेट...'

OBC Leader Laxman Hake : राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी म्हणाले की, 'हाके हा बदमाश आहे. त्याच्याकडे पाच वर्ष काम करणाऱ्या ड्रायव्हरचा पगार त्यानी दिला नाही.
Laxman Hake addresses the Fortuner vehicle controversy, says he paid for driver and costs.
Laxman Hake addresses the Fortuner vehicle controversy, says he paid for driver and costs.sarkarnama
Published on
Updated on

Laxman Hake News : ओबीसी आंदोलन लक्ष्मण हाके यांना परभणी तालुक्यातील राणीसावरगावच्या ओबीसी नेत्यांनी फॉर्च्युनर गाडी गिफ्ट केली आहे. त्यांना मिळालेल्या गाडीवरून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. त्यातच हाकेंकडे ड्रायव्हर म्हणून पूर्व काम करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

हाकेंनी आपला दोन वर्षांचा पगार बुडवला तसेच पत्नीला नोकरीला लावण्याचे खोटे आश्वासन दिल्याचा आरोप त्यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम केलेले सचिन बंडगर यांनी केला. या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी देखील हाकेंना टार्गेट केले. आता या प्रकरणी हाकेंनी खुलासा केला आहे.

एका वृत्तवाहिनीश संवाद साधताना लक्ष्मण हाके म्हणाले, 'जो आरोप करतो आहे तो माझ्या समाजतला कार्यकर्ता आहे. त्याने जेव्हा जेव्हा माझ्याकडे ड्रायव्हिंग केलं त्या त्यावेळी मी त्याला पैसे देण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडे जेव्हा पैसे नव्हते तेव्हा महाराष्ट्रातील अनेक लोकांनी त्याला पाच हजार, दहा हजार दोन हजार असे त्याला पैसे दिलेले आहेत.'

Laxman Hake addresses the Fortuner vehicle controversy, says he paid for driver and costs.
Laxman Hake: हाकेंच्या अडचणी वाढणार; गिफ्ट मिळालेल्या फॉर्च्युनर गाडीची चर्चा अन् ड्रायव्हर म्हणतो; पगार बुडवला,पत्नीला...

'मी त्याला पैसे दिले पण माझं दुर्देव येवढच की पैसे दिल्यानंतर मी कागदावर त्याची सही घेऊ शकलो नाही. रोहित पवार अजित पवार यांच्यासारखा माझ्याकडे कारखाना नाही.कुठली संस्था माझ्याकडे नाही. जेणेकरून ड्रायव्हरला दिलेला पगाराचे रेकाॅर्ड माझ्याकडे मेंटेन करेन. मी चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे.', असे देखील हाके यांनी म्हटले.

ओबीसींच्या टाळूवरचे लोणी खालले...

राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी म्हणाले की, 'हाके हा बदमाश आहे. त्याच्याकडे पाच वर्ष काम करणाऱ्या ड्रायव्हरचा पगार त्यानी दिला नाही. त्याच्या नावाने आर्थिक व्यवहार केले. ओबीसींच्या टाळवरचे लोणी खाणारा हाक्या आहे. हाक्याकडून आम्ही गरीब ड्रायव्हरचे पैसे वसूल करू. '

Laxman Hake addresses the Fortuner vehicle controversy, says he paid for driver and costs.
Thackeray Brothers Reunion : 'लपवण्यासारखे काही नाही...'; ठाकरे बंधू एकत्र येणार? मनसे नेत्याकडून फोटो शेअर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com