Power Cut : विदर्भात महायुतीला बसणार लोडशेडिंगचा 'शाॅक' !

Load shedding : राज्यात पहिल्या टप्प्याचे मतदान समोर असताना विदर्भात अघोषित भारनियमन सुरू आहे. राज्यात सर्वाधिक वीजनिर्मिती केंद्र विदर्भात असताना लोकसभा मतदानाच्या वेळी भारनियमनाचा फटका महायुतीला बसू शकतो.
Load Shedding
Load Shedding Sarkarnama

ूVidharbha Lok Sabha Election 2024 : राज्यात तापमान वाढीबरोबर राज्यात विजेची मागणी वाढली आहे. ही वाढलेली विजेची मागणी पूर्ण करण्यात महावितरणला तारेवरची कसरत करावी लागत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात ज्या भागात निवडणूक आहे. त्या भागात वीजनिर्मितीचे मोठे संच चंद्रपूर, कोरोडी, खापरखेडा, पारस येथे कार्यान्वित असताना या भागात विजेचे भारनियमन वाढले असून, यामुळे सामान्य नागरिकांना चांगलाच फटका बसत आहे.

मतदान तारखेपर्यंत अशाच प्रकारचे अघोषित भारनियमन कायम राहिले तर याचा सर्वाधिक फटका हा महायुतीला बसण्याची चिन्हं आहे. विदर्भात उन्हाळी पिकं घेतली जात नाहीत. त्यामुळे शेती पिकांसाठी जास्तीची मागणी विदर्भात नाही. अशा वेळी विदर्भात विजेचे भारनियमन करणे हे लोकसभा निवडणुकीत मतदारांचा रोष वाढविण्यासारखे आहे. राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्या या भारनियमनाकडे दुर्लक्ष का, असा प्रश्न विचारला जात आहे. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Load Shedding
Maval Lok Sabha Constituency : निवडून आल्यावर भाजपमध्ये जाणार नाही, 'या' उमेदवाराने मतदारांना दिले वचन!

उन्हाचा चटका जसा वाढायला लागला आहे. तशी राज्यात विजेची मागणीदेखील वाढली आहे. ही वाढती मागणी पूर्ण करण्यात महानिर्मिती आणि खासगी कंपन्या अपयशी ठरत आहेत. राज्यात आजची विजेची मागणी ही 25 हजार मेगावाॅट इतकी होती, तर राज्यात महानिर्मिती आणि खासगी कंपन्यांद्वारे एकत्रित वीजनिर्मिती ही केवळ 16 हजार मेगावाॅट इतकीच आहे. असे असताना निर्माण होणारा तुटवडा पाहता राज्यात अघोषित भारनियमन करावे लागत आहे. त्यात राज्यातील काही औष्णिक विद्युत केंद्र हे निम्म्या क्षमतेवर सुरू आहेत. त्यामुळे वीजनिर्मितीकडे राज्य शासनाचे तसेच ऊर्जामंत्र्यांचे दुर्लक्ष का असा प्रश्न आहे.

राज्यात लोकसभा निवडणुक पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होत आहे. यात रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमुर आणि वीज उत्पादक जिल्हा चंद्रपुर येथे लोकसभेचे मतदान होणार आहे. अशा प्रकारे अघोषित भारनियमनाचा फटका विदर्भातील जनतेला बसणे सुरू असताना महायुतीला मतदार शाॅक दिल्याशिवाय राहणार नाहीत. राज्यातील वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मितीने त्यांचे सगळे वीज उत्पादक संच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याची गरज होती. पण, तसे झाले नाही. त्यामुळे याचा फटका आता महायुतीला बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचार आज थंडावला असला तरी भारनियमनाचा चटका हा महायुतीला निवडणुकीत फटका दिल्याशिवाय राहणार नाही. निर्मिती, वितरण आणि पारेषण कंपन्यांचे खासगीकरणाच्या वाऱ्यामुळे वीज कामगार संघटनांचा एनडीएला सुप्त विरोध आहे. अशा वेळी अघोषित भारनियमन मतदारांना कल बदलण्यास कारणीभूत ठरू शकतो.

राज्यातील आजची वीजनिर्मिती

राज्यात नाशिक येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून 336 मेगावाॅट, कोरोडी (जि. नागपूर) 1687 मेगावाॅट, खापरखेडा (जि.नागपूर)1053 मेगावाॅट, पारस (जि.अकोला) 461 मेगावाॅट, परळी (जि. बीड) 469 मेगावाॅट, चंद्रपूर 1992 मेगावाॅट, भुसावळ 813 मेगावाॅट अशी एकूण 7 हजार मेगावाॅट वीजनिर्मिती कोळसाआधारित अर्थात औष्णिक वीज केंद्रातून होत आहे. हे सर्व संच महानिर्मितीच्या ताब्यात आहेत, तर उरण गॅस येथून 364 मेगावाॅट होत आहे, तर खासगी कंपन्या जिंदाल - 1230 मेगावाॅट, अदानी 2421 मेगावाॅट, आयडीयल 213 मेगावाॅट, रतन अमरावती 1306 मेगावाॅट, अशा खासगी कंपन्यांच्या एकत्रित वीज उत्पादन हे 7200 मेगावाॅट इतके आहे.

आजचे विदर्भातील तापमान

अकोला 42.1 अंश सेल्सिअस, वाशीम 42.2 अंश सेल्सिअस, वर्धा 41.5 अंश सेल्सिअस, यवतमाळ 41.5 अंश सेल्सिअस, चंद्रपूर 41.4अंश सेल्सिअस, गडचिरोली 41.4अंश सेल्सिअस, नागपूर 40.2 अंश सेल्सिअस, गोंदिया 39.8 अंश सेल्सिअस, अमरावती 40.8 अंश सेल्सिअस, बुलडाणा 40.2 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविले गेले.

R

Load Shedding
VBA News : 'पतंगाची हवा गुल, म्हणूनच अकोल्यात पाठिंबा देण्याचं नाटक' ; 'वंचित'चा ओवेसींना टोला!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com