VBA News : 'पतंगाची हवा गुल, म्हणूनच अकोल्यात पाठिंबा देण्याचं नाटक' ; 'वंचित'चा ओवेसींना टोला!

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency : ... यामागे प्रकाश आंबेडकर यांना मानणारा दलित समाज आणि त्यांची मते एमआयएमकडे वळवण्याचा ओवेसींचा डाव असल्याचे बोलले जात आहे.
Afsar Khan and Owaisi
Afsar Khan and OwaisiSarakarnama

Loksabha Election 2024 : एमआयएमचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी छत्रपती संभाजीनगरमधील सभेत वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना अकोला मतदारसंघातून एमआयएमचा पाठिंबा जाहीर केला. यावर वंचित आघाडीचे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अफसर खान यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीनगरातून एमआयएमच्या पतंगाची हवा गुल झाली आहे, म्हणूनच ओवेसी यांनी हे पाठिंब्याचे नाटक केले असल्याचा आरोप खान यांनी केला.

संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात(Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency) एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसचे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अफसर खान यांना उमेदवारी दिली आहे. खान यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून इम्तियाज जलील आणि वंचितच्या समर्थकांमध्ये सोशल मीडियावर वॉर रंगले होते. दोन्ही बाजूंनी एकमेकांची छायाचित्रे पोस्ट करत चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रकार सुरू झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Afsar Khan and Owaisi
Mp Imtiaz Jalil : इम्तियाज जलील यांनी 'वंचित'बाबत केलेली 'ती' मागणी ओवेसींनी एका झटक्यात मान्य केली

दरम्यान, इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी तीन दिवसांपासून संभाजीनगरात मुक्कामी असलेल्या ओवेसी यांनी शहागंज येथील सभेत प्रकाश आंबेडकर यांना अकोला लोकसभा मतदारसंघात पाठिंबा जाहीर केला. यामागे प्रकाश आंबेडकर यांना मानणारा दलित समाज आणि त्यांची मते आपल्याकडे वळवण्याचा एमआयएमचा डाव असल्याचे बोलले जाते.

प्रकाश आंबेडकर किंवा 'वंचित'च्या कुठल्याही राज्यस्तरावरील नेत्यांनी अद्याप 'एमआयएम'ने जाहीर केलेल्या पाठिंब्यावर अधिकृत वक्तव्य केलेले नाही. परंतु 'वंचित'चे संभाजीनगर लोकसभेचे उमेदवार अफसर खान यांनी मात्र प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर करणे म्हणजे एमआयएमची नौटंकी असल्याचे म्हटले आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत हिंदू मतांमध्ये झालेले विभाजन इम्तियाज जलील यांच्या पथ्यावर पडले होते. परंतु गेल्या पाच वर्षांत इम्तियाज जलील यांनी मतदारसंघात कुठल्याच प्रकारचा विकास केला नाही. शिवाय वंचित बहुजन आघाडीमुळे मिळालेली दलित बांधवांची एकगठ्ठा मते त्यांच्यापासून दूर गेली आहेत.

Afsar Khan and Owaisi
Lok Sabha Election 2024 : रावसाहेब दानवेंचा पॅटर्नच वेगळा; संभाजीनगरची थेट उमेदवारीच केली जाहीर...

त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरातून पतंगाची हवा गुल झाल्याचा अंदाज ओवेसी आणि त्यांच्या स्थानिक नेत्यांना, खासदाराला आला आहे. म्हणूनच त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना न मागता एकतर्फी पाठिंबा जाहीर करून नाटक केले आहे. परंतु त्यांच्या या खेळीला वंचित बहुजन आघाडी व या पक्षाला मानणारा गोरगरीब, वंचित घटक कोणत्याही परिस्थितीत बळी पडणार नाही आणि इम्तियाज जलील यांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही अफसर खान यांनी दिला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com